प्रसिद्ध महिला डॉक्टरची दिरानेच केली हातोडा, कैचीने वार करून हत्या, समोर आलं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 03:28 PM2021-07-21T15:28:59+5:302021-07-21T15:30:48+5:30

Crime News: डोक्यावर हातोड्याने प्रहार करून आणि कैचीने सपासप वार करून या महिला डॉक्टरची हत्या करण्यात आली. दरम्यान, हत्येचं कारण ऐकून पोलिसांनाही धक्का बसला आहे.

The famous female doctor was stabbed to death with a hammer In Varanasi | प्रसिद्ध महिला डॉक्टरची दिरानेच केली हातोडा, कैचीने वार करून हत्या, समोर आलं धक्कादायक कारण

प्रसिद्ध महिला डॉक्टरची दिरानेच केली हातोडा, कैचीने वार करून हत्या, समोर आलं धक्कादायक कारण

Next

वाराणसी - उत्तर प्रदेशमधीलवाराणसीमध्ये आज धक्कादायक घटना घडली आहे. येथील प्रसिद्ध डॉक्टर आणि कर्करोग तज्ज्ञ सपना दत्त (Sapna Dutta) यांची क्लिनिकमध्येच हत्या करण्यात आली. दरम्यान, ही हत्या अन्य कुणी नाही तर खुद्द महिला डॉक्टरच्या दिरानेच केल्याचे समोर आले आहे. डोक्यावर हातोड्याने प्रहार करून आणि कैचीने सपासप वार करून डॉ. दत्त यांची हत्या करण्यात आली. दरम्यान, हत्येचं कारण ऐकून पोलिसांनाही धक्का बसला आहे. (The famous female doctor was stabbed to death with a hammer In Varanasi )

वाराणसीमधील मध्य भागातील सिगरा परिसरात असेलल्या रघुवरनगर कॉलनीमध्ये दत्ता क्लिनिक आहे. येथेच डॉ. सपना दत्ता यांची हत्या करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पोलीस तपासामध्ये डॉ. सपना गुप्ता यांची हत्या करणारी व्यक्ती ही अन्य कुणी नाही तर त्यांचा दिरच असल्याचे तपासात उघड झाले. डीसीपी वरुणा जोन यांनी घटनेची माहिती देताना आरोपी दीर अनिल कुमार दत्ता याला अटक करण्यात आल्याचे सांगितले. 

दरम्यान, अटक करण्यात आल्यानंतर आरोपीने हत्येमागे जे कारण सांगितले ते ऐकून पोलिसांनाही धक्का बसला आहे. आरोपी अनिल कुमार दत्ता याने आपला गुन्हा कबूल करताना सांगितले की, त्याची वहिनी डॉ. सपना गुप्ता ह्या त्याला नपुंसक म्हणून हिणवायच्या. जेव्हा मी त्यांच्या घरी आई वडिलांना भेटायला जायचो तेव्हा त्या शिविगाळ करून मल नपुंसक म्हणायच्या. आज मी १२ च्या सुमारास त्यांच्या घरी गेलो. तेव्हाही त्यांनी मला पुन्हा नपुंसक म्हणून हिणवले. त्यामुळे मी रागाच्या भरात त्यांच्यावर हाडोता आणि चाकूने वार करून त्यांची हत्या केली. या हत्येची मी कबुली देतो.

दरम्यान, या घटनेनंतर शहरामध्ये खळबळ उडाली आहे. तर वाराणसीमधील प्रसिद्ध डॉक्टराची अशी प्रकारे हत्या झाल्याने शहरातील वैद्यकीय जगतात दु:खाचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणामागचं नेमकं कारण शोधून काढण्यासाठी इतर पैलूंचाही शोध घेण्यास सुरुवात केली आहे.  

Web Title: The famous female doctor was stabbed to death with a hammer In Varanasi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app