अभिनेत्रीला अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी प्रसिद्ध फॅशन डिझायनरच्या मुलाला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 16:00 IST2022-03-06T15:59:34+5:302022-03-06T16:00:18+5:30
Crime News : एका व्हीव्हीआयपीच्या मुलाने माझ्यावर व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज केला आहे. 25 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता त्याने मला ते अश्लील संदेश पाठवले तेव्हा तो पूर्णपणे नशेत होता.

अभिनेत्रीला अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी प्रसिद्ध फॅशन डिझायनरच्या मुलाला बेड्या
बंगळुरु - प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रसाद बिडप्पा यांचा मुलगा ॲडम बिडप्पा याला कन्नड चित्रपट अभिनेत्रीला अश्लील संदेश पाठवल्याप्रकरणी शुक्रवारी अटक करण्यात आली. ही अभिनेत्री कोण आहे याचा खुलासा अद्याप झालेला नाही. पोलिसात तक्रार दाखल करताना अभिनेत्री म्हणाली- मला आणि माझ्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. एका व्हीव्हीआयपीच्या मुलाने माझ्यावर व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज केला आहे. 25 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता त्याने मला ते अश्लील संदेश पाठवले तेव्हा तो पूर्णपणे नशेत होता.
अभिनेत्रीने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, 'त्याचे मेसेजेस अपमानास्पद, धक्कादायक, घृणास्पद आणि खूप दुखावणारे आहेत. यामुळे गेल्या आठवडाभरात मला खूप मानसिक त्रास झाला आहे. मी सात महिन्यांची गरोदर आहे. नकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून मी दूर आहे.
प्रसाद बिडप्पा यांच्याबद्दल खूप आदर असल्याचे अभिनेत्रीने म्हटले आहे. अभिनेत्रीने पोलिसांना सांगितले की, ॲडमच्या आईने तिला सांगितले होते की, ॲडमने यापूर्वी देखील नशेत असेच इतर लोकांसोबत केले होते. मी त्याच्या आई-वडिलांबद्दल खूप वाईट वाटत आहे. पण मला स्वत:ला वाचवायचे असल्याने तक्रार नोंदवावी लागली असे अभिनेत्री म्हणाली.