कौटुंबिक वादाचा रक्तरंजित अंत! मोठ्या भावाच्या मेहुणीवर जडले प्रेम; संतापलेल्या भावाने धाकट्याचा काटा काढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 09:41 IST2026-03-31T09:41:04+5:302026-03-31T09:41:55+5:30

कर्नाटकच्या तुमकूरमध्ये अनैतिक संबंधाच्या आरोपावरून मोठ्या भावाने आणि वडिलांनी मिळून धाकट्या भावाची हत्या केली. अपघाताचा बनाव रचला तरी पोलिसांनी गुपित उघड केले.

Family dispute ends in bloodshed! Elder brother falls in love with sister-in-law; Angry brother kills younger brother | कौटुंबिक वादाचा रक्तरंजित अंत! मोठ्या भावाच्या मेहुणीवर जडले प्रेम; संतापलेल्या भावाने धाकट्याचा काटा काढला

AI Generated Image

रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना कर्नाटकच्या तुमकूर शहरात उघडकीस आली आहे. मोठ्या भावाच्या मेहुणीशी असलेल्या कथित प्रेमसंबंधांतून उद्भवलेल्या वादाचे रूपांतर हत्येत झाले. मोठ्या भावाने आपल्या वडिलांच्या मदतीने धाकट्या भावाचा क्रूरपणे बळी घेतला. स्टालिन असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी पोलिसांनी त्याचा मोठा भाऊ नवीन आणि वडील जॉन पॉल यांना बेड्या ठोकल्या आहेत.

एका आरोपाने संसाराची राखरांगोळी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉन पॉल यांना नवीन आणि स्टालिन ही दोन मुले होती. नवीनचे लग्न झाले असून त्याची पत्नी सध्या गरोदर आहे. दुसरीकडे, स्टालिनचा जेनिफर नावाच्या तरुणीशी साखरपुडा झाला होता. लग्नाची तयारी सुरू असतानाच जेनिफरने लावलेल्या एका आरोपामुळे कुटुंबात खळबळ उडाली. स्टालिनचे त्याच्या मोठ्या भावाच्या मेहुणीशी आणि खुद्द नवीनच्या पत्नीशीही अवैध संबंध असल्याचा दावा जेनिफरने केला. यावरून घरात गेल्या आठवड्याभरापासून सतत खटके उडत होते.

अपघाताचा बनाव फसला

२२ मार्च रोजी वादाने टोक गाठले आणि संतापलेल्या नवीनने वडील जॉन पॉल यांच्या साथीने स्टालिनवर जीवघेणा हल्ला केला. गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनी स्टालिनला सिद्धगंगा रुग्णालयात दाखल केले आणि एक खोटी कथा रचली. "बाईक उभी करताना तो पडला आणि रेलिंगला आदळल्याने त्याच्या पोटाला दुखापत झाली," असे त्यांनी डॉक्टरांना सांगितले. मात्र, पाच दिवसांच्या उपचारांनंतर स्टालिनचा मृत्यू झाला.

पोलिसी खाक्या दाखवताच सत्य बाहेर

जयनगर पोलिसांनी मृतदेहाची तपासणी केली असता त्यांना स्टालिनच्या शरीरावरील जखमा अपघाताच्या नसून शस्त्राने केलेल्या वार असल्याचा संशय आला. पोलिसांनी सुरुवातीला वडील जॉन पॉल यांची उलटतपासणी केली. सुरुवातीला त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी हत्येची कबुली दिली. स्वतःच्याच मुलाच्या हत्येत बापाने मोठ्या मुलाची साथ दिल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title : पारिवारिक विवाद में खूनी अंत: भाई ने अफेयर में छोटे भाई को मार डाला।

Web Summary : कर्नाटक में एक व्यक्ति ने अपने पिता की मदद से अपने छोटे भाई की हत्या कर दी क्योंकि छोटे भाई का अपनी भाभी और भाई की पत्नी के साथ कथित संबंध था। दुर्घटना के रूप में अपराध को छिपाने के प्रयास विफल होने के बाद पिता और बड़े भाई को गिरफ्तार किया गया है।

Web Title : Family feud turns deadly: Brother kills younger sibling over affair.

Web Summary : A Karnataka man, with his father's help, murdered his younger brother due to a family dispute arising from the younger brother's alleged affairs with his sister-in-law and brother's wife. The father and elder brother have been arrested after a failed attempt to cover up the crime as an accident.