बलात्काराची खोटी तक्रार करणं महागात, भरावा लागणार 'इतका' दंड
By पूनम अपराज | Updated: February 1, 2021 14:36 IST2021-02-01T14:34:53+5:302021-02-01T14:36:21+5:30
Crime News : न्यायालायने महिलेला २० हजार रुपये दंड ठोठावला. जर ती रक्कम भरण्यास असमर्थ ठरली तर तिला १५ दिवसांची शिक्षा होईल.

बलात्काराची खोटी तक्रार करणं महागात, भरावा लागणार 'इतका' दंड
उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथील रहिवासी असलेल्या महिलेवर तिच्याशेजाऱ्याविरूद्ध खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल करणं महागात पडलं आहे. शनिवारी विशेष न्यायालयाने संबंधित महिलेवर दंड ठोठावला आहे.
ऑक्टोबरमध्ये महिलेने रजत नावाच्या तिच्या शेजाऱ्याविरोधात रात्री तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. तिच्या तक्रारीच्या आधारे रजतला भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांतर्गत अटक करण्यात आली. रजतला ऑक्टोबर २०२० मध्ये तुरूंगात पाठवण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी घेताना विशेष न्यायाधीश (पॉक्सो अॅक्ट), महेंद्र श्रीवास्तव यांच्या कोर्टाने खटल्याच्या वेळी पुराव्यांच्या आधारे बलात्काराचा आरोप खोटा असल्याचे एका राष्ट्रीय दैनिकाच्या अहवालानुसार म्हटले आहे.
पोस्टमार्टम रिपोर्ट येताच सर्वजण हादरले, आठवीच्या मुलीने गळफास लावून केली आत्महत्या
न्यायालायने महिलेला २० हजार रुपये दंड ठोठावला. जर ती रक्कम भरण्यास असमर्थ ठरली तर तिला १५ दिवसांची शिक्षा होईल. विशेष सरकारी वकील (पॉक्सो अॅक्ट) उत्कर्ष वत्स यांनी सांगितले की, “दंडाची ५० टक्के रक्कम रजत यांना देण्यात येईल, असेही कोर्टाने आदेश दिले आहेत.