The fake professor deceived both of them and made the third world; Forced unnatural relationship with wife | तोतया प्राध्यापकाने दोघींना फसवून थाटला तिसरीशी संसार; पत्नीशी जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध

तोतया प्राध्यापकाने दोघींना फसवून थाटला तिसरीशी संसार; पत्नीशी जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध

जळगाव : आधी एकीशी साखरपुडा, दुसरीशी तोतयेगिरी करुन तिसरीशी संसार थाटून तिच्या जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध ठेवणाऱ्या पियुष हरिदास बावस्कर या तोतया प्राध्यापकासह त्याचे वडील हरिदास खंडू बावस्कर, सासु वासंती बावस्कर व चुलत सासरे शंकर खंडू बावस्कर (सर्व रा.संभाजी कॉलनी, औरंगाबाद) यांच्याविरुध्द गुरुवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या मनिषा (वय २५,काल्पनिक नाव) हीचे औरंगाबाद येथील पियुष हरिदास बावस्कर याच्याशी ९ जानेवारी रोजी सरदार वल्लभभाई पटेल (लेवा भवन) येथे विवाह झाला होता.विवाहाच्या पूर्वी लग्न जुळविणाऱ्या लोकांनी तसेच पियुषच्या कुटुंबियांनी तो श्री साई पॉलीटेक्नीक कॉलेज ऑफ इंजिनियरींग औरंगाबाद या संस्थेत कायम स्वरुपी प्राध्यापक म्हणून नोकरीला आहे व त्याला कसलेही व्यसन नाही असे सांगितले होते.लग्न झाल्यानंतर मनिषा सासरी गेली असता दोन दिवसानंतर पती दारु पिऊन आला व अश्लिल भाषेत शिवीगाळ करु लागला. यानंतर रोजच हा प्रकार सुरु असताना काही इतर महिला व मुलींशी त्याचे संबंध असल्याचे जाणवले, मोबाईलमध्ये रेकॉर्डींग तसेच व्हाटसअॅप झालेला संवाद दिसून आली. हा प्रकार सासु-सासऱ्यांना सांगितला असता त्यांनी मदत करण्याऐवजी धमकीच दिली. हा प्रकार वाढतच गेला. मद्याच्या नशेत पतीकडून जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य होत असल्याने पत्नीने हा प्रकार फोन करुन आई, वडीलांना सांगून घ्यायला औरंगाबाद येथे बोलावून घेतले. माहेरी येतान अंगावरील दागिनेही जबरदस्तीने काढून घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: The fake professor deceived both of them and made the third world; Forced unnatural relationship with wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.