खळबळ! ‘एसपी चंद्रपूर’ नावाने तयार केले बनावट फेसबुक आयडी, लुबाडले अनेकांकडून पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2020 21:51 IST2020-11-17T21:50:13+5:302020-11-17T21:51:17+5:30
Cyber Crime : सायबर गुन्हेगारीचे थेट पोलिसांनाच आव्हान

खळबळ! ‘एसपी चंद्रपूर’ नावाने तयार केले बनावट फेसबुक आयडी, लुबाडले अनेकांकडून पैसे
चंद्रपूर : दररोज मोबाईलवर कोणते ना कोणते कारण सांगून बॅंक खात्यातील रकमेच्या मोठ्या प्रमाणावर चोऱ्या सुरू आहे. याचा तपास लावण्यासाठी पोलीस खात्याने सायबर सेल तयार केले. या चोऱ्यांचा छडा लावण्यात व्यस्त असलेल्या चंद्रपूर पोलिसांनाच सायबर गुन्हेगारीने ‘एसपी चंद्रपूर’ या नावाने बनावट फेसबुक आयडी तयार करून थेट आव्हान दिले आहे.
एसपी चंद्रपूर या बनावट फेसबुक आयडीवरून सुरुवातीला अधिकृत फेसबुकमधील फेसबुक मित्रांना फ्रेन्डस रिक्वेस्ट पाठविले गेले. त्यांना आर्थिक अडचणी सांगून गुगुल पे व फोन पे द्वारे पैसे पाठविण्यासाठी विनंती करीत असल्याची धक्कादायक बाब सायबर सेलच्या निदर्शनास आली आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केलेला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिली.
इंटरनेट वापरकर्ते सायबर गुन्हेगारांचे लक्ष्य
सायबर गुन्हेगार इंटरनेटवरील वापरकर्त्यांचे वर्तन तपासून त्यांची फसवणूक करीत आहे. यातही ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण मुले-मुली यांना लक्ष्य केले जात आहे. सायबर गुन्ह्यांबाबत समाजात नसलेली जागृकता कारणीभूत असल्याची बाब पोलीस अधीक्षक साळवे यांनी अधोरेखित केली. सोशल मीडियाद्वारे बनावट फेसबुक प्रोफाईल, मॅसेंजर तयार करून पैशाची मागणी, व्हॉटस?पद्वारे चॅटींग करून ब्लॅकमेलींग, आॅनलाईन वॉलेटची, क्रेडीट कार्डची केवायसी, नोकरीचे आमिष अशी विविध कारणांचा आधार घेऊन सर्व सामान्य नागरिकांची फसवणूक होत असल्याचे पोलीस अधीक्षक साळवे यांनी सांगितले.
खोट्या शापिंग वेबसाईटही गुन्हेगारांचा अड्डा
लॉकडाऊनच्या काळात आॅनलाईन खरेदीच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. जास्तीत जास्त लोकांनी विविध प्रकारचे पेमेंट आॅनलाईन करण्यावर भर दिला. याचाच फायदा घेऊन सायबर गुन्हेगार खोट्या शॉपिंग वेबसाईट तयार करण्यावर भर देत आहे.लॉकडाऊनच्या काळात नोकरी गमावलेल्या व्यक्तींना सरकारकडून भत्ता मिळेल, अशी आमिषे दाखविली जात आहे. ही
ही काळजी घ्यावी
कोणत्याही संशयित लिंकवर क्लीक न करणे, अनोळखी ई-मेलच्या अटॅचमेंट फाईल डाऊनलोड न करणे, कोणत्याही वेबसाईटला भेट देताना वेबसाईट स्पेलींग पुन्हा-पुन्हा तपासणे, काहीवेळा स्पेलींगमध्ये थोडा बदल करून बनावट वेबसाईट तयार केल्या जात आहे.
फसवणूक होताच व शंका येताच १०० डायल करा
नागरिकांनी सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये, तरीही अशी फसवणूक झाली वा होण्याची शंका येताच पोलीस नियंत्रण कक्षाला १०० या क्रमांकावर कॉल करून माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे.