शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

तोतया सीबीआय अधिकाऱ्याचा पर्दाफाश; गुन्हे शाखेने केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 9:00 PM

जयेश जगदीश शेट्टी असे आरोपीचे नाव असून त्याच्या फरार साथीदारांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

ठळक मुद्देतोतया सीबीआय अधिकाऱ्याच्या गुन्हे शाखेच्या कक्ष १० ने मुसक्या आवळल्या आहेत. अशा प्रकारे अंधेरी येथील एका ज्वेलर्सची त्यांनी १ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केली होती.

मुंबई - सीबीआय (केंद्रीय गुप्तचर यंत्रणा) अधिकारी असल्याचे भासवून बनावट सोने ज्वेलर्सला देऊन फसवणूक करणाऱ्या तोतया सीबीआय अधिकाऱ्याच्या गुन्हे शाखेच्या कक्ष १० ने मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. जयेश जगदीश शेट्टी असे आरोपीचे नाव असून त्याच्या फरार साथीदारांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

जयेश वसई परिसरात राहतो. तो आणि त्याचे फरार साथीदार हे ज्वेलर्सच्या दुकानात जातात. या ठिकाणी मालकाचा विश्वास संपादन करतात. त्यानंतर काही जण ज्वेलर्सच्या दुकानात येतात. सीबीआय अधिकाऱ्याने फोन केला असल्याचे भासवून सोने गहाण ठेवण्याच्या नावाखाली बनावट सोने देत होते. अशा प्रकारे अंधेरी येथील एका ज्वेलर्सची त्यांनी १ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केली होती.

ज्वेलर्स फसवणूक प्रकरणी नुकताच अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुह्याचा तपास गुन्हे शाखा कक्ष १० चे अधिकारी करीत होते. पोलीस निरीक्षक अरविंद घाग, सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर मुदिराज, वाहिद पठाण, एएसआय धोंडीराम सावंत, पोलीस हवालदार गावंडे यांनी सुरू तपास सुरु केला. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. यावेळी पोलिसांनी जयेशला वसईतून ताब्यात घेत त्याला अटक केली. तर याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसCBIगुन्हा अन्वेषण विभाग