फेसबुक पोस्टद्वारे मुख्यमंत्र्यांना धमकी देणाऱ्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 19:12 IST2019-02-04T19:12:09+5:302019-02-04T19:12:39+5:30
या पोस्टमध्ये खंडाळा येथे मुख्यमंत्र्यांसह किमान ४० हजार सातारकरांचा जीव घेणार असल्याचा उल्लेख करण्यात आला होता या प्रकारामुळे साताऱ्यामध्ये खळबळ मोठी उडाली होती. ही पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

फेसबुक पोस्टद्वारे मुख्यमंत्र्यांना धमकी देणाऱ्याला अटक
मुंबई - फेसबुक पोस्टद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातारा दौऱ्यादरम्यान जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या पोस्टमध्ये खंडाळा येथे मुख्यमंत्र्यांसह किमान ४० हजार सातारकरांचा जीव घेणार असल्याचा उल्लेख करण्यात आला होता या प्रकारामुळे साताऱ्यामध्ये खळबळ मोठी उडाली होती. ही पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पंकज कुंभार या तरुणाने ही फसबुक पोस्ट केली होती. मुंबईतील आग्रीपाडा परिसरातून त्याला जेरबंद करण्यात आले. दरम्यान, हा तरुण मनोरुग्ण असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. या तरुणाला आग्रीपाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन सातारा पोलिसांच्या हवाली केले आहे.