पत्नीसोबत अतिप्रसंग; मित्राचा काढला काटा, डोक्यात हातोडी मारून केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 07:23 IST2025-01-14T07:23:13+5:302025-01-14T07:23:31+5:30
शवविच्छेदन अहवालात या सगळ्याची पोलखोल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

पत्नीसोबत अतिप्रसंग; मित्राचा काढला काटा, डोक्यात हातोडी मारून केली हत्या
बदलापूर : बदलापुरात एका नराधमाने त्याच्या मित्राच्या पत्नीवर अतिप्रसंग केला. या घटनेबाबत पतीकडे वाच्यता केल्यास तिला ठार मारण्याची धमकी दिली. मात्र, हे वारंवार घड्डू लागल्यानंतर पत्नीने पतीला याची माहिती दिली. यानंतर पतीने मित्राच्या डोक्यात हातोडी मारून हत्या केली आणि बाथरूममध्ये पडून त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला. मात्र, शवविच्छेदन अहवालात या सगळ्याची पोलखोल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.
शिरगाव परिसरात राहणाऱ्या नरेश आणि सुशांत यांची चांगली मैत्री होती. सुशांत याने नरेशच्या पत्नीवर अतिप्रसंग करीत पतीला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर त्याने तिला वारंवार धमकी देत तिच्यावर अतिप्रसंग केला. अखेर पत्नीने हिंमत करून नरेशला सुशांतच्या या कृत्याची माहिती दिली.
नरेशने अपघाताचा बनाव अतिदारू प्यायल्याने बाथरूममध्ये पहून सुशांतच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला, असा बनाव रचत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र, ज्यावेळेस सुशांतचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला, त्यावेळेस नरेशची पोलखोल झाली.
आपल्याला याबाबत काहीच माहीत नसल्याचे भासवत १० जानेवारी रोजी सुशांतला घरी बोलावले. या दोघांनी मद्यपान केले. त्या रात्री सुशांत हा नरेशच्याच घरी मुक्कामी राहिला. पहाटेच्या सुमारास नरेशने सुशांतच्या डोक्यात हातोडी मारून त्याची हत्या केली. सुशांतचा मृत्यू अवजड वस्तूने डोक्यात प्रहार केल्यामुळे झाल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये नमूद केले होते. यानंतर पोलिसांनी नरेशला ताब्यात घेतल्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली.