Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 17:13 IST2025-10-31T17:11:44+5:302025-10-31T17:13:19+5:30
woman fled with son's father in law: मुलाच्या ज्या व्यक्तीच्या मुलीसोबत लग्न ठरलं, त्याच्यावर महिलेचा जीव जडला. दोघांमधील बोलणं वाढलं आणि लग्नाआधीच दोघेही फरार झाले. पण, प्रकरण उघडकीस कसं आलं?

Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
Woman Fled with Daughter in Law's Father: मुलाचे लग्न ठरले. लग्नाची तारीखही ठरली आणि लग्नाला ८ दिवस शिल्लक असताना मुलाची आई बेपत्ता झाली. घरच्यांनी महिलेला सगळीकडे शोधलं पण ती मिळाली नाही. त्यानंतर महिला बेपत्ता झाल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी शोध सुरू केला. पोलिसांना मिळाली ती होणाऱ्या सुनेच्या बापासोबत. तिला पोलीस ठाण्यात आणण्यात आले, तेव्हा लग्नाची तयारी सुरू असताना मोबाईल दररोज चर्चा सुरू होत्या. त्यातच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर लग्नाला आठ दिवस शिल्लक असतानाच दोघे फरार झाले.
४५ वर्षीय महिला आणि ५० वर्षाच्या सुनेच्या बापाची लव्हस्टोरीने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. कारण दोघांमध्ये जे सुरू होत, त्याची कल्पना दोन्हीकडच्या कुटुंबीयांना नव्हती. पोलिसांनी बेपत्ता महिलेला शोधल्यानंतर हे दोन विवाहितांचे प्रेम प्रकरण समोर आले.
ही घटना उज्जैनमध्ये घडली आहे. महिला उज्जैनमधील उंटवासा गावात राहते. तर ती ज्या व्यक्तीसोबत पळून गेली, तो चिखलीचा रहिवाशी आहे. मुलाचे लग्न ठरले. त्यानंतर मुलाच्या आईचे होणाऱ्या सुनेच्या वडिलांसोबत लग्नाच्या तयारीसाठी दररोज बोलणं होत होतं.
महिला घरातून गेली पळून
मोबाईलवरील संवादातूनच दोघांना एकमेकांबद्दल प्रेम निर्माण झाले. त्यांच्यातील प्रेम संबंध वाढले आणि दोघांनी मुलगा आणि मुलीच्या लग्नाचा विचार न करता पळून जाण्याचा निर्णय घेतला. लग्न आठ दिवसांवर असतानाच महिला घरातून फरार झाली. घरच्यांनी शोध घेतला आणि नंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी महिलेचा शोध सुरू केला. सगळीकडे शोध सुरू असताना महिला चिखलीमध्ये आढळून आली. पोलीस तिला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. तिथे तिची चौकशी केली. त्यावेळी तिने होणाऱ्या सुनेच्या वडिलांसोबतचं प्रेम प्रकरण सांगितले. ते ऐकून पोलिसही अवाक् झाले.
पोलिसांनी काय सांगितले?
बडनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी अशोक पाटीदार यांनी सांगितले की, महिला पती आणि तीन मुलांसोबत ऊंटवासा गावात राहते. तर ज्या व्यक्तीसोबत ती पळून गेली, तो चिखलीमध्ये राहतो. तो शेतकरी आहे. त्याच्या पत्नीचे निधन झालेले असून, तो दोन मुलांसह राहतो.
लग्न आठ दिवसांवर असताना महिला मुलाच्या उपचाराच्या निमित्ताने बडनगरला आली होती. तिथून ती पळून गेली. हे प्रकरण कुटुंबीयांना कळले. त्यांनी महिलेला समजवण्याचा प्रयत्न केला, पण महिला ऐकायलाच तयार झाली नाही आणि व्यक्तीसोबत निघून गेली.