शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडने लग्नासाठी ठेवलेली अट; आईने ३ वर्षांच्या लेकीचा काढला काटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 15:44 IST

विवाहबाह्य संबंधांमुळे एका आईने आपल्या तीन वर्षांच्या लेकीची हत्या करून मृतदेह सुटकेसमधून फेकून दिला.

बिहारच्या मुझफ्फरपूरमधून एका तीन वर्षांच्या निष्पाप मुलीची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. विवाहबाह्य संबंधांमुळे एका आईने आपल्या तीन वर्षांच्या लेकीची हत्या करून मृतदेह सुटकेसमधून फेकून दिला. गुरुवारी सकाळी मुलीचा मृतदेह आढळून आला. तपासादरम्यान पोलिसांना कळलं की, मिष्टी असं या मुलीचं नाव असून ती मनोज कुमार आणि काजल  यांची मुलगी आहे. जे परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. मुलीच्या वडिलांनी तिच्या आईवरच हत्येचा संशय व्यक्त केला.

पोलिसांनी मुलीच्या आईला ताब्यात घेऊन तिची कडक चौकशी केली. आरोपी काजलने पोलिसांना सांगितलं की, तिचे रामपुरहरी पोलीस स्टेशन परिसरातील एका तरुणासोबत मागील एक वर्षापासून प्रेमसंबंध होते. तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं पण तरुणाला आपल्या मुलीला सोबत ठेवायचं नव्हतं. त्यामुळे तिने टीव्हीवरील क्राईम पेट्रोल ही मालिका पाहिल्यानंतर आपल्या मुलीची हत्या केली आणि मृतदेह सुटकेसमध्ये भरून कचऱ्यात फेकून दिला.

काजलने पोलिसांना सांगितलं की, शुक्रवारी दुपारी तिने पती मनोज याला फोनवर सांगितले होतं की, आपण आपल्या मुलीसोबत वाढदिवसासाठी मावशीच्या घरी जात आहोत. दुसऱ्या दिवशी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर त्याच लाल रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये तीन वर्षीय मिष्टीचा मृतदेह आढळून आला. काजल यानंतर पळून गेली. तिने तिचे सर्व दागिने, आधार कार्ड आणि इतर वस्तू घेतल्या आणि फोन बंद केला.

पतीने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी काजलचा फोन ट्रेस केला आणि लोकेशनच्या आधारे तिला सोमवारी रामपुरहरी पोलीस स्टेशन हद्दीतील तिच्या प्रियकराच्या घरातून अटक केली. चौकशीत काजलने आपल्या मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. मुलगी तिच्या प्रियकरासोबत राहण्यात अडथळा ठरत असल्याचं तिने पोलिसांना सांगितले. कारण प्रियकराने तिला मुलासोबत स्वीकारणार नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं होतं.

या प्रकरणावर एसपी अवधेश दीक्षित म्हणाले की, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पथक तयार करून तपास सुरू केला आहे. एफएसएफच्या पथकाने घरातून अनेक पुरावे गोळा केले. आरोपी काजलने आपल्या तीन वर्षांच्या निष्पाप मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. महिलेने आपल्या मुलीची हत्या केली, त्यानंतर मृतदेह सुटकेसमध्ये भरून गच्चीवरून फेकून दिला. यानंतर खोलीतील रक्ताचे डाग स्वच्छ केले. हत्येत वापरलेला चाकूही पोलिसांनी जप्त केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारPoliceपोलिस