शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लाखोंची ऑईल भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; मुंबई पोलिसांची कारवाई  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 17:50 IST

5.18 लाखांची ऑईल भेसळ

ठळक मुद्देकक्ष 9 च्या पथकातील पोलीस निरीक्षक आशा कोरके यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत 3 टँकरसह भेसळयुक्त ऑईल जप्त करण्यात आले असून या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा कक्ष 9 चे पथक करत आहे. सफू नसिम खान (48), राजू कैलास सरोज (32), याकूब मोहम्मद नसिम सिद्धिकी (26) यांना बेड्या ठोकण्यात आल्या.

मुंबई - बीपीसीएल कंपनीच्या फर्नेस ऑइल टँकरमधील फर्नेस ऑइल चोरी करून त्यामध्ये भेसळ करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा कक्ष ९ ने अटक केली आहे.बीपीसीएल कंपनीच्या फर्नेस ऑईलची चोरी करून उर्वरित ऑईलमध्ये पाणी टाकून भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात गुन्हे शाखेच्या कक्ष ९च्या पोलिसांना यश आले आहे.  कक्ष 9 च्या पथकातील पोलीस निरीक्षक आशा कोरके यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने ही कारवाई केली. आरोपींनी एकूण 14 हजार 800 लिटरहून अधिक (5 लाख 18 हजार रुपये) ऑईलमध्ये भेसळ केल्याचे तपासादरम्यान उघडकीस आणले आहे.चेंबूर परिसरातील माहुल गाव येथे बीपीसीएल कंपनी आहे. या कंपनीच्या समोरील पार्किंगमध्ये बीपीसीएल कंपनीच्या ऑईल टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टाकून भेसळ होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आशा कोरके यांना मिळाली. त्या माहितीनुसार पोलिसांनी पार्किंगमध्ये धाड टाकली. त्यावेळी ऑईलच्या 3 टँकरमधील कप्प्यांमध्ये पाणी व भेसळयुक्त फर्नेस ऑईल आढळून आले. या प्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात भादंवि कलम 379, 420, 472, 462, 484, 120(ब) सह जिवनावश्यक वस्तू व कायदा कलम 3, 7 नुसार गुन्हा दाखल करून सफू नसिम खान (48), राजू कैलास सरोज (32), याकूब मोहम्मद नसिम सिद्धिकी (26) यांना बेड्या ठोकण्यात आल्या. या कारवाईत 3 टँकरसह भेसळयुक्त ऑईल जप्त करण्यात आले असून या गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखा कक्ष 9 चे पथक करत आहे.भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश सह पोलीस आयुक्त (गुन्हे) संतोष रस्तोगी, गुन्हे प्रकटीकरण - 1 चे उपायुक्त अकबर पठाण, सहाय्यक पोलीस आयुक्त (डी/पश्चिम) भारत भोईटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशा कोरके, संजीव गावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर जाधव, शरद धराडे, पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक कोरे, विजेंद्रय आंबावडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बनसोडे, हवालदार शिर्के, शिंदे, मोहिते, जाधव, काकडे, गावकर, सावंत, पाटील, शिंदे, शेख, कोळी, झोडगे, पोलीस नाईक पेडणेकर, नाईक, हाक्के, राऊत, लोखंडे, पाटील, कदम, वानखेडे, परब, पोलीस शिपाई कांबळे, महांगडे, पवार, गवते, निकम, महिला पोलीस शिपाई लाड आदी पथकाने केला.

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसChemburचेंबूरMumbaiमुंबईAdultery Lawव्यभिचार