Exposing a gang of doctors blackmarketing injections on Remdisivir; Arrested for selling at inflated rates | रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या डॉक्टरच्या गँगचा पर्दाफाश; चढ्या दराने विकणाऱ्यांना केली अटक   

रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या डॉक्टरच्या गँगचा पर्दाफाश; चढ्या दराने विकणाऱ्यांना केली अटक   

ठळक मुद्देअटक केलेल्या आरोपींची नावे रिज़वान आरिफ गलीभ हुसेन मन्सूरी (32),  सिद्धार्थ केशवप्रसाद यादव (21) आणि  चिरंजीवी शिवपूजन विश्वकर्मा (28) अशी आहेत.

रेमडेसिविर इंजेक्शन हे  कोरोना या आजारावर प्रभावी असल्याने त्याचा बाजारामध्ये तुटवडा भासत असून त त्याची बेकायदेशीर साठवणूक करुन बाजार भावापेक्षा जास्त किमतीने विक्री होत असून त्यावर नियंत्रण आणण्यासाठी अशा लोकांना शोधून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत वरिष्ठांनी आदेशित केले होते. त्या अनुषंगाने सहाय्यकी पोलीस निरीक्षक पवार  यांना त्यांचे गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली होती असून त्यानुसार सापळा रचून चढ्या दराने रेमडेसिविर इंजेक्शन विकणाऱ्या त्रिकुटावर कारवाई करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींची नावे रिज़वान आरिफ गलीभ हुसेन मन्सूरी (32),  सिद्धार्थ केशवप्रसाद यादव (21) आणि  चिरंजीवी शिवपूजन विश्वकर्मा (28) अशी आहेत. यापैकी रिजवान हा डॉक्टर आहे. 

पोलीस अधिकारी पवार यांना १३ एप्रिल रोजी सायकांळी ७ वाजताच्या सुमारास एक इसम हा रेमडेसिविर इंजेक्शन हे MRP किमतीपेक्षा जास्त किमतीने ( 20,000/- ) विकण्याकरिता चारकोप नाका,  मालवणी मालाड(प.)  येथे येणार आहे, अशी माहिती प्राप्त झाली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश पवार, निगराणी पथक व दोन लायक पंच तसेच अन्न व औषध प्रशासनचे औषध निरीक्षक यांच्यासह तेथे जाऊन सापळा रचला असता ७. ३० वाजताच्या सुमारास सदर इसम हा त्याचे जवळील रेमडेसिविर इंजेक्शन विक्री करण्याच्या उददेशाने आला असता एका खबरीला 500 रूपये दराचे दोन नोटा व 59000/-  रुपये देऊन पाठविले असता नमूद इसमाने खबरीस सदर नोटा दिल्या व त्या मोबदल्यात 3 रेडमिसिविर इंजेक्शन विक्री केली असता त्याच वेळी नमूद इसमासह अजून एक इसम तेथे आला होता नमूद दोन्ही इसामांना  सापळा रचून ताब्यात घेतले व त्यांच्याकडे सदर रेमडेसिविर इंजेक्शन कोणाकडून आणली अशी चौकशी केली असता त्यांनी सदर इंजेक्शन हे मेडिकल प्रतिनिधी (MR)  चिरंजीव विश्वकर्मा याच्याकडून विकत घेतली असल्याचे सांगीतले आणि तो पैसे घेण्याकरिता येणार आहे असे सांगीतले असता त्यास देखील काही वेळाने सापळा रचून ताब्यात घेतले व पोलिस स्टेशन येथे आणून औषध निरिक्षक निशिगंधा पष्टे यांनी त्यांच्याविरूध्द दिलेल्या फिर्यादीवरून मालवणी पोलिस ठाण्यात कलम 420,34 भादंवि सह परिच्छेद 26 औषध किंमत नियंत्रण आदेश 2013 सह वाचन कलम 3(2)(c) तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 चे उल्लंघन दंडनीय कलम 7(1)(A)(2) तसेच औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 कलम 18(a)(6) 18(B) 22(1)( CCA) दंडनीय कलम 27(D) 28(A) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून नमूद तिन्ही आरोपी यांना नमूद गुन्ह्यांत अटक करण्यात आली आहे.

 तपासादरम्यान आरोपी चिरंजीव विश्वकर्मा याने सदर इंजेक्शन हे हयात रुग्णालय मालवणी येथील मेडिकलमधून विकत कायदेशीररीत्या विकत घेतली असल्याचे सांगितले त्यावरून ड्रग्स इन्स्पेक्टर यांचे सह सदर मेडिकलमध्ये गेलो असता तेथे देखील काही आक्षपार्ह नोंदी आढळून आल्या असून त्याचा अहवाल ड्रग्स इन्स्पेक्टर हे परस्पर त्यांचें वरिष्ठांना सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Exposing a gang of doctors blackmarketing injections on Remdisivir; Arrested for selling at inflated rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.