तुकड्या-तुकड्यातील क्रुरता उघड, सुटकेसमध्ये आणखी 2 अवयव सापडले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 07:22 PM2019-12-10T19:22:02+5:302019-12-10T19:26:08+5:30

आज पुन्हा बीकेसीनजीक असलेल्या मिठी नदीत बेनेट यांच्या शरीराचे आणखी अवयव सापडले आहेत.  

Exposing cruelty to crumbs, 2 more bodies were found in the suitcase | तुकड्या-तुकड्यातील क्रुरता उघड, सुटकेसमध्ये आणखी 2 अवयव सापडले

तुकड्या-तुकड्यातील क्रुरता उघड, सुटकेसमध्ये आणखी 2 अवयव सापडले

Next
ठळक मुद्देपोलिसांना सापडलेले शरीराचे तुकडे हे बेनेट रिबेलो यांचे असल्याचे तपासत निष्पन्न झाले आहे. मात्र, अद्याप शीर, धड आणि दोन्ही पायांच्या मांड्या सापडलेले नाही 

मुंबई - माहीम येथील दर्ग्यामागे समुद्रकिनारी सापडलेल्या सुटकेसमध्ये मानवी शरीराचे अर्धवट २ डिसेंबरला आढळून आले होते. त्यानंतर पोलिसांनी शिताफीने तपास करत मुंबईपोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष - ५ ने सुतापासून स्वर्ग गाठत मृत व्यक्तीची ओळख पटवली आणि हत्या करणाऱ्या आराध्या पाटील अटक केली आणि तिचा प्रियकर विधी संघर्ष बालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांना सापडलेले शरीराचे तुकडे हे बेनेट रिबेलो यांचे असल्याचे तपासत निष्पन्न झाले आहे. आज पुन्हा बीकेसीनजीक असलेल्या मिठी नदीत बेनेट यांच्या शरीराचे आणखी अवयव सापडले आहेत.  

समुद्रात माहीम पोलिसांना एक सुटकेस सापडली होती. त्या सुटकेसमध्ये मानवी शरीराचे अवयव पोलिसांना आढळून आले होते. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष - ५ ने अतिशय क्लिष्ट अशा हत्येचा मेहनतीने आणि तांत्रिक बाबींचा तपास करून उलगडा केला आहे. या हत्याप्रकरणात पोलिसांनी आरोपीला वाकोल्यातून अटक केली आहे. अटक आराध्याने पोलिसांकडे जबाब नोंदविताना बेनेट यांची स्वतःला मानसकन्या म्हणून घेणाऱ्या आराध्याने बेनेट यांची लैंगिक अत्याचारास बळजबरी करत असल्याने प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचे सांगितले.

तसेच बेनेट यांच्या शरारीच्या दोन्ही पायांचे दोन तुकडे, दोन हात, धड, गुप्तांग आणि शीर असे तुकडे करून ते तीन सुटकेसमध्ये भरून मिठी नदीत फेकून देण्यात आले असल्याची माहिती आराध्याने पोलिसांना दिली होती. पोलिसांना माहीम येथे समुद्रकिनाऱ्यावर गुप्तांग, डावा हात आणि पायाचा भाग सापडला होता. आज मिठी नदीत उजवा हात आणि पाय बॅगेत सापडला आहे. मात्र, अद्याप शीर, धड आणि दोन्ही पायांच्या मांड्या सापडलेले नसल्याची माहिती कक्ष - ५ चे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश साईल यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.  

फेसबुकवरील 'तो' फोटो अन् टेलरच्या माहितीवरून पोलिसांनी केला हत्येचा उलगडा

 

Web Title: Exposing cruelty to crumbs, 2 more bodies were found in the suitcase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.