मुंब्रा पोलिसांनी विस्फोटक साहित्य केले जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 17:44 IST2018-11-30T17:42:12+5:302018-11-30T17:44:41+5:30
रिक्षाच्या तपासणीत मागच्या बाजूला गोणीमध्ये 250 डिटोनेटर आणि 250 जिलेटीनच्या कांडय़ा पोलिसांना आढळून आल्या. ते साहित्य आणि रिक्षा ताब्यात घेऊन पोलिसांनी गणपतसिंग सोलंकी याला अटक केली. गणपतराव हा दिव्याच्या मुंब्रादेवी कॉलनीत राहतो. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुंब्रा पोलिसांनी विस्फोटक साहित्य केले जप्त
मुंब्रा - पोलिसांनी दिव्यातून मोठय़ा प्रमाणावर विस्फोटक साहित्य जप्त केल्याची घटना उघडकीस आली. दिवा-आगासन रोडवर वाहनामधून विस्फोटक साहित्य येणार असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी संध्याकाळी सापळा रचून पोलिसांनी तेथून जात असलेली रिक्षा (एमएच ०३ सीडब्ल्यू ९०३७) ताब्यात घेतली. रिक्षातील संशयित व्यक्ती पळून जाण्याचा प्रयत्न करत असतानाच पोलिसांच्या पथकाने गणपतसिंग रावतसिंग सोलंकीला (वय ४२) याला ताब्यात घेतलं. रिक्षाच्या तपासणीत मागच्या बाजूला गोणीमध्ये 250 डिटोनेटर आणि 250 जिलेटीनच्या कांडय़ा पोलिसांना आढळून आल्या. ते साहित्य आणि रिक्षा ताब्यात घेऊन पोलिसांनी गणपतसिंग सोलंकी याला अटक केली. गणपतराव हा दिव्याच्या मुंब्रादेवी कॉलनीत राहतो. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.