लग्नाची वरात पडली महागात, कुटुंबासह जमावावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 13:10 IST2021-02-25T13:02:33+5:302021-02-25T13:10:29+5:30
Crime News : एनआरआय पोलिसांना माहिती मिळताच विनापरवाना सुरु असलेली वरात थांबवण्याचा प्रयत्न केला.

लग्नाची वरात पडली महागात, कुटुंबासह जमावावर गुन्हा दाखल
नवी मुंबई : कोरोनामुळे जमावबंदी असताना देखील लग्नाची वरात काढल्या प्रकरणी लग्न कुटुंबासह जमावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यादरम्यान पोलिसांनी गाणी बंद करण्याचा प्रयत्न केला असता जमावाने हुज्जत देखील घातली.
दिवाळे गाव येथे मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. तिथल्या एका कुटुंबात लग्नसोहळा असल्याने रात्री वरात काढण्यात आली. त्यामध्ये २०० हुन अधिकचा समावेश होता. त्यांच्याकडून विना मास्क वावरत सामाजिक अंतर देखील राखले जात नव्हते.
याबाबत एनआरआय पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी विनापरवाना सुरु असलेली वरात थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु वारातीतल्या जमावाने पोलिसांसोबत हुज्जत घालत वरात सुरूच ठेवली. त्यामुळे पोलिसांनी लग्नकुटुंबासह सुमारे २०० च्या जमावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी अद्याप कोणाला अटक केलेली नाही. कोरोनामुळे सोहळे व उत्सवांना आवर घालण्याच्या सूचना शाशनाकडून होत आहेत. त्यानंतर देखील कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्ताने जमाव जमवला जात असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली.