खळबळजनक ! माहीम परिसरात धारदार शस्त्राने वार करून तरुणाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 20:42 IST2018-11-29T20:41:47+5:302018-11-29T20:42:55+5:30
. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
_201707279.jpg)
खळबळजनक ! माहीम परिसरात धारदार शस्त्राने वार करून तरुणाची हत्या
मुंबई - माहीम येथील समुद्र किनाऱ्याच्या परिसरात 34 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
माहीम येथील हिंदुजा रुग्णालयाच्या मागे एका तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर माहीम पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. हा मृतदेह आपल्या भावाचा असल्याचे एका व्यक्तीने सांगितले. त्यावरून हा मृतदेह अफसर खान (वय 34) नावाच्या तरुणाचा असल्याचे समजले. त्याचा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत असून अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत. पोलीस घटनास्थळानजीक असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत.