खळबळजनक! कोपरखैरणेत भरदिवसा घरात घुसून वृद्धाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 17:25 IST2018-11-12T17:25:04+5:302018-11-12T17:25:31+5:30
विजयकुमार दाहोत्रे (वय ६२) असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांचा मुलगा निखिल जखमी झाला आहे. ते कोपर खैरणे सेक्टर १४ येथील कृष्णा टॉवर मध्ये राहत होते. आज दुपारी इमारतीमधील पाचव्या मजल्यावरील घरात दोघेच असताना हा प्रकार घडला.

खळबळजनक! कोपरखैरणेत भरदिवसा घरात घुसून वृद्धाची हत्या
सुर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - कोपर खैरणे येथे घरात घुसून वृद्धाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये इतर एकजण जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.
विजयकुमार दाहोत्रे (वय ६२) असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांचा मुलगा निखिल जखमी झाला आहे. ते कोपर खैरणे सेक्टर १४ येथील कृष्णा टॉवर मध्ये राहत होते. आज दुपारी इमारतीमधील पाचव्या मजल्यावरील घरात दोघेच असताना हा प्रकार घडला. अचानक घरामध्ये घुसलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी विजयकुमार यांना मारहाण करून घरातील लोखंडी वस्तू त्यांच्या डोक्यात मारल्या. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या मुलाला देखील मारहाण झाली असून त्यात तो जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक आयुक्त प्रदीप जाधव यांच्यासह कोपर खैरणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र या हल्यामागचे नेमके कारण मात्र अद्याप कळू शकलेले नसल्याचे सहाय्यक आयुक्त प्रदीप जाधव यांनी सांगितले. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलीस परिसरातील तसेच इमारतीमधील सीसीटीव्ही तपासत आहेत.