नकली नोटांची अदलाबदली, वाडा पोलिसांनी सापळा रचून तिघांना केली अटक; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 10:38 IST2025-02-24T10:38:10+5:302025-02-24T10:38:18+5:30

सापळा रचून रविवारी दुपारच्या सुमारास तीन आरोपींना रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले.

Exchange of fake notes, Wada police set a trap and arrested three; seized valuables worth Rs 14 lakhs | नकली नोटांची अदलाबदली, वाडा पोलिसांनी सापळा रचून तिघांना केली अटक; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त 

नकली नोटांची अदलाबदली, वाडा पोलिसांनी सापळा रचून तिघांना केली अटक; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त 

लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडा : तालुक्यातील पाली गावच्या हद्दीत काही जण भारतीय चलनातील खऱ्या नोटा व तशाच नकली नोटा एकत्रित करून त्या चलनात आणण्यासाठी व अदलाबदल करण्यासाठी एकत्र येणार असल्याची माहिती वाडा पोलिसांना मिळाली होती. त्यांनी सापळा रचून रविवारी दुपारच्या सुमारास तीन आरोपींना रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे १४ लाख रुपयांच्या नकली नोटा आढळल्या.

विकास ऊर्फ विकी पवार (वय ३२), इम्तियाज शेख (५६), वसीम सय्यद (३६) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पाली गावच्या हद्दीत काही जण नकली नोटा अदलाबदलीसाठी येणार आहेत, अशी माहिती मिळाल्याने पोलिसांनी दोन पंचांना बोलावले. पोलिस व पंच असे वेश पालटून पाली नाका येथे रविवारी दबा धरून बसले असता जिल्हा परिषद शाळा पालीच्या मेन गेटजवळ एकजण काळ्या रंगाची बॅग घेऊन संशयास्पद हालचाली करताना दिसला. त्याच्यावर पाळत ठेवून पोलिस दबा धरून बसले होते. 
दुपारी ३:४५च्या सुमारास विक्रमगड बाजूकडून कार शाळेच्या गेटजवळ येऊन थांबली. त्या कारमधून दोघे उतरले व त्या व्यक्तीशी चर्चा करताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अशा प्रकारच्या नकली नोटांमुळे खळबळ उडाली आहे.

नोटांचे बंडल
या तिघांकडे ५०० रुपयांच्या १६०० नोटा तसेच १०० रुपयांच्या ५७३० एवढ्या नोटांचे बंडल आढळून आले.  
काळ्या रंगाचे पुठ्ठ्यांचे बंडल,चिकटपट्ट्या असा मुद्देमाल मिळून १४ लाख किमतीच्या नकली नोटा मिळून आल्या. ते नोटा अदलाबदलीसाठी वापरणार होते. 

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस निरीक्षक दत्तात्रेय किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर मालकर, मयुरेश अंबाजी, मयूर शेवाळे, पोलिस हवालदार गुरुनाथ गोतारणे, विजय मढवी, मनोज चौधरी, गजानन जाधव, भूषण खिल्लारे, संतोष वाकचौरे यांच्या पथकाने केली. याबाबत वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Exchange of fake notes, Wada police set a trap and arrested three; seized valuables worth Rs 14 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.