शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

महाराष्ट्रातील माजी आमदाराच्या संपत्तीवर टाच; ED ने जप्त केली १५२ कोटींची मालमत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 12:21 IST

मुंबईच्या कर्नाला नागरी सहकारी बँक लिमिटेडचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार विवेकानंद पाटील यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे.

मुंबई - केंद्रीय तपास यंत्रणांपैकी एक असलेल्या ईडीकडून सध्या अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे. बड्या राजकीय नेत्यांची संपत्तीची चौकशी करुन संबंधितांवर कारवाईही करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच ईडीने आम आदमी पक्षाचे नेते खासदार संजय सिंह यांच्यावर कारवाई केली होती. त्यानंतर, गुरुवारी ईडीने एका माजी आमदारावर कारवाई करत कोट्यवधींची संपत्ती जप्त केली आहे. माजी आमदार विवेकानंद पाटील यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. विवेकानंद पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे ४ वेळा आमदार राहिले आहेत. नवी मुंबईतील उरण मतदासंघातून ते आमदार बनले होते.

मुंबईच्या कर्नाला नागरी सहकारी बँक लिमिटेडचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार विवेकानंद पाटील यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे. ईडीने गुरुवारी विवेकानंद पाटील आणि त्यांच्याशी संबंधित लोकांवर कारवाई करत तब्बल १५२ कोटींची संपत्ती जप्त केली. ५४० कोटी रुपयांच्या फसवणूकप्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणात आत्तापर्यंत ३८६ कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता  जप्त करण्यात आली आहे. 

दरम्यान, ईडीने १५ जून २०२१ रोजीच माजी आमदार विवेकानंद पाटील यांना अटक केली आहे. पाटील यांनी ६७ फेक बँक अकाऊंटच्या माध्यमातून कोट्यवधींची अफरातफरी केली होती. सन २००८ साली त्यांनी बँकेतील व्यवहारात भ्रष्टाचार व आर्थिक फसवणूक केल्याचे पोलिस तपासातून समोर आले होते.

मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे शाखेच्या कारवाईवरुन दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या आधारावर ईडीने तपास सुरू केला होता. सन २०१९ साली रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार ऑडिट करण्यात आल्यानंतर हे प्रकरण समोर आले. विवेकानंद पाटील यांनी ६३ फेक बँक अकाऊंटच्या माध्यमातून कर्ज काढून कर्नाला चॅरिटेबल ट्रस्ट आणि कर्नाला स्पोर्ट्स अॅकॅडमीला ही रक्कम दिली होती. या दोन्ही संस्थेची स्थापन आणि नियंत्रण पाटील यांच्याकडेच आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रMLAआमदारEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयNavi Mumbaiनवी मुंबई