अखेर स्टंटमॅनला गाठावे लागले पोलीस ठाणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 15:35 IST2019-02-26T15:30:15+5:302019-02-26T15:35:06+5:30

या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.

Eventually, the police station had to reach Stuntman | अखेर स्टंटमॅनला गाठावे लागले पोलीस ठाणे 

अखेर स्टंटमॅनला गाठावे लागले पोलीस ठाणे 

ठळक मुद्देगोरेगाव पूर्वेकडील परिसरात तक्रारदार शाहनवाज मेहमूद खान (४३) हे कुटुंबासह राहतात.अचानक पंजाबला शूटिंगसाठी जावे लागल्याने त्यांनी दुचाकीचा शोध घेतला. बराच शोध घेऊनही दुचाकी सापडली नाही.

मुंबई - सिनेमातील बाइक स्टंटपूर्वी एका स्टंटमॅनला पोलीस ठाणे गाठावे लागल्याचा प्रकार दिंडोशीत समोर आला. शूटिंगला जाण्यापूर्वी चोराने त्याची दुचाकी चोरली. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.

गोरेगाव पूर्वेकडील परिसरात तक्रारदार शाहनवाज मेहमूद खान (४३) हे कुटुंबासह राहतात. ते मालिका, तसेच चित्रपटांमध्ये स्टंटमॅन म्हणून काम करतात. १६ जानेवारी रोजी त्यांनी दुचाकी इमारतीखाली पार्क केली. त्यानंतर, अचानक पंजाबला शूटिंगसाठी जावे लागल्याने त्यांनी दुचाकीचा शोध घेतला. मात्र, बराच शोध घेऊनही दुचाकी सापडली नाही. अखेर त्यांनी पंजाबवरून आल्यानंतर दिंडोशी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पोलीस अधिक तपास करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. 

Web Title: Eventually, the police station had to reach Stuntman