शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जयपूरमध्ये ईडीच्या अधिकाऱ्याला अटक, खटला रद्द करण्यासाठी घेतली १५ लाखांची लाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 16:16 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) तक्रारदाराकडून १५ लाख रुपयांची लाच घेताना ईडीच्या अधिकाऱ्याला रंगेहात अटक केली आहे.

जयपूर : देशातील अनेक नेत्यांच्या ठिकाणांवर सातत्याने होणारे छापे आणि त्यांच्यावर सुरू असलेली कारवाई, यामुळे सध्या अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चर्चेत आहे. दरम्यान, राजस्थानमधील तपास यंत्रणा ईडीच्या अधिकाऱ्याकडून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जयपूरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच घेतल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) इंफाळच्या एका अधिकाऱ्याला आणि त्याच्या सहकाऱ्याला अटक केली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) तक्रारदाराकडून १५ लाख रुपयांची लाच घेताना ईडीच्या अधिकाऱ्याला रंगेहात अटक केली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, लाच घेतल्याचा आरोप असलेला अधिकारी एका प्रकरणात त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या आरोपीकडून पैसे मागत होता. चिटफंड प्रकरणात एका आरोपीला अटक होऊ नये, यासाठी ईडीच्या अधिकाऱ्याने १७ लाख रुपयांची मागणी केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला ईडी अधिकारी मणिपूरमधील इंफाळ येथील कार्यालयात काम करत होता.  नवल किशोर मीना असे त्याचे नाव आहे. याशिवाय, त्याचा स्थानिक सहकारी बाबुलाल मीणा यालाही अटक करण्यात आली आहे. इंफाळ येथील ईडी कार्यालयात नोंदवलेल्या चिटफंड प्रकरणात त्याच्याविरुद्धचा खटला रद्द करणे, मालमत्ता जप्त न करणे आणि अटक न करण्याच्या बदल्यात १७ लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याची तक्रार तक्रारदाराकडून करण्यात आली. ही मागणी आरोपी नवल किशोर मीणा यांनी केली आहे. 

या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ईडीच्या अधिकाऱ्याविरुद्धच्या तक्रारीची पडताळणी केली आणि गुरुवारी आरोपी नवल किशोर मीना उर्फ ​​एनके मीना याला जयपूर येथून अटक केली. यावेळी त्याचा साथीदार बाबुलाल मीना उर्फ ​​दिनेश याच्यामार्फत तक्रारदाराकडून १५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नवल किशोर हा मूळचा बस्सीच्या विमलपुरा गावचा रहिवासी आहे. तर त्याचा सहकारी बाबूलाल हा उपनिबंधक कार्यालय-मुंडवार येथे कनिष्ठ सहाय्यक म्हणून कार्यरत आहे.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयRajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग