Elvish Yadav House Firing: हरियाणातील गुरुग्राम येथे युट्यूबर आणि बिग बॉस ओटीटी विजेता एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीला फरीदाबाद गुन्हे शाखेने एन्काउंटरनंतर अटक केली आहे. पोलिसांच्या पथकाने फरीदाबादच्या शूटर इशांत उर्फ इशू गांधीला चकमकीदरम्यान पकडले. पोलिसांशी झालेल्या चकमकीदरम्यान, आरोपी इशांतच्या पायाला गोळी लागली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चकमकीदरम्यान दोन्ही बाजूंनी अनेक राउंड गोळीबार झाला.
फरिदाबाद गुन्हे शाखा सेक्टर-३० च्या पथकाला माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. यादरम्यान, पोलिसांना पाहताच आरोपीने ऑटोमेटिक पिस्तूलने पोलिस पथकावर अर्धा डझनहून अधिक गोळ्या झाडल्या. पोलिसांनी इशांतवर प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. पोलिसांनी झाडलेली गोळी आरोपीच्या पायाला लागली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आणि उपचारासाठी बीके रुग्णालयात दाखल केले. आरोपी इशांतने त्याच्या एका साथीदारासह त्याने गुरुग्राममधील एल्विश यादवच्या घरावर गोळीबार केल्याचा आरोप आहे.
आरोपी इशांतने त्याच्या एका साथीदारासह त्याने गुरुग्राममधील एल्विश यादवच्या घरावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. शूटर इशांने नुकताच गुरुग्राममधील युट्यूबर एल्विश यादवच्या घरावर गोळीबार केला होता. या घटनेपासून तो पोलिसांच्या रडारवर होता. फरिदाबाद गुन्हे शाखा त्याचा शोध घेत होती. पोलीस आता त्याच्या इतर नेटवर्कची आणि कट रचणाऱ्यांची माहिती गोळा करत आहेत.
दरम्यान, १७ ऑगस्ट रोजी सकाळी, गुरुग्राम सेक्टर ५७ मधील युट्यूबर एल्विश यादवच्या घराबाहेर दोन मुखवटा घातलेल्या हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला आणि दोन डझनहून अधिक गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर भाऊ गँगने सोशल मीडियावर पोस्ट टाकून हल्ल्याची जबाबदारी घेतली. एल्विशच्या घरी सकाळी ५:३० ते ६ च्या दरम्यान गोळीबाराची घटना घडली. त्यावेळी एल्विश यादव घरी नव्हती. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.