चकमकफेम दया नायक यांची एटीएसमध्ये बदली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 01:37 PM2019-09-24T13:37:39+5:302019-09-24T13:39:04+5:30

प्रशासकीय करणास्तव ही बदली करण्यात आली

Encounter fem Daya Nayak transferred to ATS | चकमकफेम दया नायक यांची एटीएसमध्ये बदली

चकमकफेम दया नायक यांची एटीएसमध्ये बदली

Next
ठळक मुद्दे अंबोली पोलीस ठाण्यातून दहशतवाद विरोधी पथकात बदली करण्यात आली आहे. नव्वदीच्या दशकातील ८३ गुंडांना यमसदनी धाडून गुन्हेगारी जगतात दया नाईक यांनी दबदबा निर्माण केला होता.

मुंबई - चकमकफेम दया नायक यांची काल मुंबई शहर येथील अंबोली पोलीस ठाण्यातून दहशतवाद विरोधी पथकात बदली करण्यात आली आहे. प्रशासकीय करणास्तव ही बदली करण्यात आली असून महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालयातील आस्थापना विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक राजेश प्रधान यांच्या आदेशाची प्रत पोलीस निरीक्षक दया नायक यांना प्राप्त झाली आहे.  
नव्वदीच्या दशकातील ८३ गुंडांना यमसदनी धाडून गुन्हेगारी जगतात दया नाईक यांनी दबदबा निर्माण केला होता. मात्र, कालांतराने बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणात अडकून दया नाईक यांना पोलीस दलातून निलंबन करण्यात आले होते. १९९५  सालच्या तुकडीतील डॅशिंग व्यक्तिमत्व असलेल्या नायक यांनी अल्पावधीतच ‘चकमक’फेम अशी आपली ओळख निर्माण केली. मात्र, कर्नाटक येथे आपल्या आईच्या नावे बांधलेल्या शाळेचे २००६ मध्ये सुप्रसिध्द अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते उद्घाटन करणं त्यांच्या अंगाशी आलं. एका पोलीस अधिकाऱ्याकडे शाळा बांधण्यासाठी एवढे पैसे आले कुठून? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीचा (एसीबी) ससेमिरा त्यांच्यामागे लागला. गुंडांचा कर्दनकाळ अशी ओळख बनविलेल्या नायक यांना बेहिशेबी मालमत्तेच्या वादाने नाउमेद झाले. या प्रकरणी त्याच्यावर अटकेची कारवाई होऊन मुंबई पोलीस सेवेतून त्यांना निलंबित करण्यात आले. जामिनावर सुटल्यानंतर तर ते अज्ञातवासात गेले होते. अलीकडेच काही वर्षांपूर्वी ते पुन्हा पोलीस खात्यात रुजू झाले.

Web Title: Encounter fem Daya Nayak transferred to ATS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.