शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील कोविड क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेला त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 13:08 IST

पुण्यातल्या सिंडगड कॉलेजमधल्या कोविड सेंटरमध्ये ही महिला उपचार घेत आहे.

ठळक मुद्देयाप्रकरणी २७ वर्षाच्या महिलेने दिली फिर्याद

धायरी : पनवेल येथील एका क्वारंटाईनसेंटरमध्ये एका महिलेवर बलात्कार घडल्याची घटना ताजी असतानाच पुण्यातल्या सिंडगड कॉलेजमधल्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या एका महिलेला मध्यरात्री त्रास देणाऱ्या तेथील कर्मचाऱ्याने त्रास दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी लोकेश दिलीप मते (वय ३०, रा. राजयोग सोसायटी, धायरी, पुणे) या कर्मचाऱ्यास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी २७ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे.   सिंहगड कॉलेजमध्ये एकूण ५ हॉस्टेल प्रशासनाने ताब्यात घेऊन त्याठिकाणी कोविड केअर सेंटर उभारले आहे. या ठिकाणी १५०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. १४ जुलै रोजी धायरी येथील २७ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासनाच्या वतीने त्या महिलेस वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजच्या कोविड केअर सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. १६ जुलै रोजी सदर महिला कक्षात एकटी असताना येथील कर्मचारी लोकेश मते हा या महिलेच्या खोलीत गेला. व आपण सुरक्षाच्या कारणास्तव आल्याचे सांगून त्यांचा मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास त्याने या महिलेस मिस्ड कॉल केला. काही वेळाने त्याने आपल्याला काही अडचण असल्यास सांगा असा मेसेज करून त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच फोन करून अश्लील भाषेत बोलला. त्यानंतर त्याने सदर महिलेचा दरवाजा पहाटेपर्यंत ठोठावला. घाबरून जाऊन सदर महिलेने १०० नंबरला फोन करून मदत मागितली असता रात्रपाळीत असणाऱ्या मार्शलनी आमच्याकडे पीपीई किट नसल्याने आम्ही तुमच्याकडे येऊ शकत नसल्याचे सांगितले.   दुसऱ्या दिवशी सकाळी पीडीत महिलेच्या नातेवाईकांनी पालिकेकडे तक्रार केल्यानंतर या महिलेची दुसऱ्या ठिकाणी सोय करण्यात आली आहे. मात्र या निमित्ताने कोविड सेंटरमधील महिला रुग्णांचा सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

टॅग्स :DhayariधायरीCrime Newsगुन्हेगारीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसWomenमहिलाArrestअटकPoliceपोलिस