शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

ECI Website Hacking: निवडणूक आयोगाची वेबसाइट हॅक केल्याप्रकरणी एकाला अटक, तीन महिन्यात बनवली 10,000 मतदान ओळखपत्रे 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 2:52 PM

ECI Website Hacking : सहारनपूरचे एसएसपी एस चेनप्पा म्हणाले की, आरोपी विपुल सैनीने नकुड भागातील त्याच्या कम्प्युटरच्या दुकानातून हॅकिंग केले.

सहारनपूर : निवडणूक आयोगाच्या (ECI) वेबसाइट हॅक प्रकरणी आरोपी युवकाला अटक करण्यात आली आहे. अटकपूर्वी आरोपीने १०,००० हून अधिक बनावट मतदार ओळखपत्रे तयार केली होती. उत्तर प्रदेशमध्ये सहारनपूर पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. सहारनपूरचे एसएसपी एस चेनप्पा म्हणाले की, आरोपी विपुल सैनीने नकुड भागातील त्याच्या कम्प्युटरच्या दुकानातून हॅकिंग केले.

आयोगाच्या अधिकाऱ्यांचा पासवर्ड केला हॅकपोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी विपुल सैनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी वापरलेल्या पासवर्डद्वारे निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर लॉग इन करत असे. याबाबत आयोगाला संशय आला आणि तपास यंत्रणांना माहिती दिली. यंत्रणांच्या तपासादरम्यान सैनी  संशयाच्या भोवऱ्यात आला आणि त्यांनी सहारनपूर पोलिसांना सैनीबद्दल माहिती दिली.

3 महिन्यांत 10,000 हून अधिक मतदार ओळखपत्रे केली तयारएसएसपी चेनप्पा म्हणाले, "चौकशीदरम्यान सैनीने सांगितले की, तो मध्य प्रदेशातील हरदा येथील रहिवासी अरमान मलिक यांच्या सांगण्यावरून काम करत होता आणि त्याने तीन महिन्यांत १०,००० हून अधिक मतदार ओळखपत्रे बनवली होती. सायबर सेल आणि सहारनपूर गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने गुरुवारी सैनीला अटक केली.'

बँक खात्यात आढळले ६० लाख रुपयेसहारनपूर एसएसपी म्हणाले की, तपासात सैनीच्या बँक खात्यात ६० लाख रुपये आढळले असून यानंतर खात्यातून होणारे व्यवहार त्वरित थांबविण्यात आले आहेत. सैनी याच्या खात्यात ही रक्कम कोठून आली याची चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले.

आरोपीने सहारनपूर येथून केले होते बीसीए चौकशीत सैनीने सांगितले की, ओळखपत्राच्या बदल्यात त्याला १०० ते २०० रुपये मिळतात. पोलिसांनी त्याच्या घरातून दोन कम्प्यूटरही जप्त केले आहेत. तपास एजन्सी त्याला न्यायालयात हजर करेल आणि त्याच्या न्यायालयीन कोठडीसाठी अपील करेल. एसएसपी म्हणाले की, सैनीचे वडील शेतकरी आहेत. सैनीने सहारनपूर जिल्ह्यातील एका महाविद्यालयातून बीसीए केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगUttar Pradeshउत्तर प्रदेशArrestअटक