डायबेटिसला कंटाळून वृद्ध महिलेने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 21:29 IST2018-07-14T21:28:41+5:302018-07-14T21:29:27+5:30

डायबेटिसला कंटाळून वृद्ध महिलेने केली आत्महत्या
मुंबई - पवईतील रहेजा विहार येथील मेपल लिफ या गगनचुंबी इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून उडी मारून एका ७२ वर्षीय वृध्द महिलेने आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. लक्ष्मीबाई राऊत( वय - ७२) असे या मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लक्ष्मीबाई या आपल्या परिवारासोबत पवईतील रहेजा विहार मेपल लिफ इमारतीत राहत होत्या. गेल्या कित्येक दिवसांपासून त्या डायबेटिसने त्रस्त होत्या. त्यामुळेच लक्ष्मीबाई भरपूर तणावाखाली होत्या अशी माहिती त्यांच्या परिवाराकडून पोलिसांना सांगण्यात आली. आज दुपारी १७ व्या मजल्यावर असलेल्या घरातील गॅलरीतून त्यांनी उडी मारून आत्महत्या केली. त्यांना तात्काळ राजावाडी रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पवई पोलिस अधिक तपास करत असल्याची माहिती परिमंडळ १० चे पोलिस उपायुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी दिली.