एकटेपणाला कंटाळून वृद्धेची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 19:59 IST2019-02-25T19:56:04+5:302019-02-25T19:59:28+5:30
ही घटना आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

एकटेपणाला कंटाळून वृद्धेची आत्महत्या
मुंबई - परेल जेरबाई वाडिया रोडवर असलेल्या क्रेसेंट बे टॉवरमध्ये राहणाऱ्या ७३ वर्षीय वृद्ध महिलेने एकटेपणाला कंटाळून घराच्या गॅलरीतून उडी टाकत आत्महत्या केली. याबाबत आरएके मार्ग पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद केली आहे. ही घटना आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
20 डिसेंबर 2018 रोजी मृत सविता यांचे पती लक्ष्मण शर्मा यांचे निधन झाले होते. त्या दिवसापासून त्या मानसिक तणावात होत्या. तर त्यांची मुलगी ही लालबागमधील डॉ. एस.एस राव रोडवरील अशोका टॉवरमध्ये रहात होती. पतीच्या निधनानंतर सविता या मानसिक तणावाखाली होत्या. घरात एकटेपणाला त्या कंटाळल्या होत्या. वाढत्या वयामुळे आजारपणाला खिळून राहणाऱ्या सविता यांनी अखेर आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास घराच्या गॅलरीतून उडी टाकून आत्महत्या केली. याबाबतची माहिती सुरक्षा रक्षकाने पोलिसांना दिल्यानंतर आरएके पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी अपमृत्यची नोंद केली आहे.