लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पश्चिम उपनगरात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अटकेत ठेवून सव्वादोन कोटी रुपये उकळणाऱ्या सायबर भामट्यांच्या साथीदाराला मुंबई पोलिसांनी गुजरातमधून अटक केली. या गुन्ह्यादरम्यान तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाला विश्वासात घेण्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या बनावट सही असलेली एक नोटीस दाखवून जाळ्यात ओढले होते. किशन मकवाना असे अटक आरोपीचे नाव असून ही कारवाई सायबर पोलिसांनी (उत्तर विभाग) केली.
किशनने कमिशनसाठी सायबर भामट्यांना बँक खाते दिले होते. नोव्हेंबरमध्ये वृद्धाला व्हॉट्सॲप कॉल आला. अतिरेक्यांना कोट्यवधींची आर्थिक रक्कम पुरविल्याचा आरोप असून या प्रकरणाचा तपास एनआयएसह लखनऊ एटीएस करत आहे, असे सांगून घाबरवण्यात आले. आधार कार्डच्या आधारे नावे उघडण्यात आलेल्या बँक खात्यावरून ही व्यवहार झाले असून कमिशन म्हणून या खात्यावर ७० लाख रुपये जमा झाले आहेत. पुढे बँक खात्याच्या तपासणीच्या नावाखाली त्यांना सर्व रक्कम ट्रान्सफर करण्यास सांगितली. एनआयए आणि दाते यांचे नाव वापरून एक बोगस नोटीस वृद्धाला ऑनलाईन पाठवण्यात आली होती.
Web Summary : Cybercriminals digitally arrested an elderly Mumbai resident, extorting crores. They used a fake notice with DGP Sadanand Date's signature. Police arrested an accomplice, Kishan Makwana, in Gujarat for providing bank accounts for commission.
Web Summary : साइबर अपराधियों ने एक वृद्ध मुंबई निवासी को डिजिटल रूप से गिरफ्तार कर करोड़ों वसूले। उन्होंने डीजीपी सदानंद दाते के हस्ताक्षर वाली एक नकली नोटिस का इस्तेमाल किया। पुलिस ने गुजरात में एक साथी किशन मकवाना को कमीशन के लिए बैंक खाते प्रदान करने के आरोप में गिरफ्तार किया।