सदानंद दातेंच्या नावाचा वापर करत वृद्धाला डिजिटल अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 04:56 IST2026-03-07T04:56:31+5:302026-03-07T04:56:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पश्चिम उपनगरात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अटकेत ठेवून सव्वादोन कोटी रुपये उकळणाऱ्या सायबर भामट्यांच्या ...

सदानंद दातेंच्या नावाचा वापर करत वृद्धाला डिजिटल अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पश्चिम उपनगरात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अटकेत ठेवून सव्वादोन कोटी रुपये उकळणाऱ्या सायबर भामट्यांच्या साथीदाराला मुंबई पोलिसांनी गुजरातमधून अटक केली. या गुन्ह्यादरम्यान तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाला विश्वासात घेण्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या बनावट सही असलेली एक नोटीस दाखवून जाळ्यात ओढले होते. किशन मकवाना असे अटक आरोपीचे नाव असून ही कारवाई सायबर पोलिसांनी (उत्तर विभाग) केली.
किशनने कमिशनसाठी सायबर भामट्यांना बँक खाते दिले होते. नोव्हेंबरमध्ये वृद्धाला व्हॉट्सॲप कॉल आला. अतिरेक्यांना कोट्यवधींची आर्थिक रक्कम पुरविल्याचा आरोप असून या प्रकरणाचा तपास एनआयएसह लखनऊ एटीएस करत आहे, असे सांगून घाबरवण्यात आले. आधार कार्डच्या आधारे नावे उघडण्यात आलेल्या बँक खात्यावरून ही व्यवहार झाले असून कमिशन म्हणून या खात्यावर ७० लाख रुपये जमा झाले आहेत. पुढे बँक खात्याच्या तपासणीच्या नावाखाली त्यांना सर्व रक्कम ट्रान्सफर करण्यास सांगितली. एनआयए आणि दाते यांचे नाव वापरून एक बोगस नोटीस वृद्धाला ऑनलाईन पाठवण्यात आली होती.