गायीजवळ लघुशंका केल्यानं वृद्धास मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यांनतर पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2022 22:05 IST2022-01-29T22:03:39+5:302022-01-29T22:05:12+5:30
Crime News :हे प्रकरण रतलामच्या त्रिपोलिया गेट भागातील आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी एका आरोपी वीरेंद्र राठोडला अटक केली.

गायीजवळ लघुशंका केल्यानं वृद्धास मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यांनतर पोलिसांची कारवाई
रतलाम : मध्य प्रदेशातील रतलाममध्ये गायीजवळ लघवी केल्याच्या कारणावरून एका मुस्लिम वृद्धाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मारहाणीनंतर वृद्धाची टोपी बळजबरीने काढून घेतली आणि त्याच्याच पायाखाली चिरडण्यास सांगण्यात आले. वृद्ध हात जोडून माफी मागत राहिला, पण तरीही त्याला मारहाण करत राहिले, हात मुरडला गेला. हे प्रकरण रतलामच्या त्रिपोलिया गेट भागातील आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी एका आरोपी वीरेंद्र राठोडला अटक केली.
वृद्ध माफी मागत राहिले, आरोपी मारत राहिले
व्हिडिओमध्ये मारहाण झालेल्या वृद्धाचे नाव सैफुद्दीन पाटीलवाला आहे. त्याचे हार्डवेअरचे दुकान आहे. व्हिडिओमध्ये वृद्ध व्यक्ती वारंवार माफी मागताना दिसत आहे. असे असताना आरोपी त्याचे ऐकत नाही. तो त्याच्या टोपीला सतत लाथ मारत होता आणि अश्लील भाषेत शिवीगाळ करत होता.
आरोपींना अटक
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पीडित वृद्धेने पोलिसांत तक्रार केली. यानंतर आरोपी वीरेंद्र राठोडवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर २ दिवसांपासून व्हायरल होत आहे, त्यानंतर माणक चौक पोलीस ठाण्याने या प्रकरणाचा तपास केला असता हा व्हायरल व्हिडीओ रतलामचा असल्याचे निष्पन्न झाले.