मोठ्या भावाने वडिलांसह लहान भावाची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 01:48 IST2020-07-13T01:47:41+5:302020-07-13T01:48:55+5:30

जामनेर तालुक्यातील नांद्रा प्र.लो. येथे किरकोळ कौटुंबिक वादातून मोठ्या भावाने वडील व लहान भावावर चाकूने वार करून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

The elder brother murdered the younger brother along with the father | मोठ्या भावाने वडिलांसह लहान भावाची केली हत्या

मोठ्या भावाने वडिलांसह लहान भावाची केली हत्या

पहूर (ता. जामनेर) : जामनेर तालुक्यातील नांद्रा प्र.लो. येथे किरकोळ कौटुंबिक वादातून मोठ्या भावाने वडील व लहान भावावर चाकूने वार करून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मोठा भाऊ नीलेश याला वडील व लहान भावाने तू नेहमी भांडण करत असतो, असे म्हणून किरकोळ मारल्याच्या रागातून त्याने वडील आनंदा कडूबा पाटील यांना चाकूने वार करून ठार केले. नंतर लहान भाऊ महेंद्रवर वार करून त्यालाही संपविल्याची घटना शनिवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. पोलिसांनी नीलेश पाटील याला अटक केली आहे. तसेच चाकूही जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र आनंदा पाटील व त्याची पत्नी अश्विनी हे जळगावहून शनिवारी सकाळी आई वडील यांना भेटण्यासाठी आले. रात्री त्यांच्या शेजारी राहणाऱ्या पांडुरंग हिरामण सोनवणे यांच्याशी मोठा भाऊ नीलेश पाटील (३५) याचे भांडण सुरू होते. आनंदा पाटील (५५) व महेंद्र यांनी नीलेशला समजावून घरी आणले व तू नेहमी गावात भांडणे करीत असतो असे म्हणून तिन चार चापटा मारल्या. नंतर नीलेश त्याच्या खोलीत झोपला. त्यांनतर सर्वजण झोपायला गेले. रात्री अकरा ते साडे अकरा वाजता नीलेशने धारदार चाकूने ओट्यावर झोपलेल्या स्वत:च्या वडिलांचे तोंड दाबून सपासप वार केले. ते जागीच ठार झाले. महेंद्र घटनास्थळाकडे येत असताना नीलेशने त्याच्यावर वार केले, असे महेंद्रची पत्नी अश्विनी पाटील हिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: The elder brother murdered the younger brother along with the father