कल्याणमध्ये वृद्धेचे दागिने लांबवले; खाजगी रुग्णालयातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 01:58 IST2019-06-06T01:58:29+5:302019-06-06T01:58:33+5:30
पश्चिमेतील आधारवाडी परिसरात राहणाऱ्या कमलादेवी सिंग (७६) या बैलबाजार परिसरात असलेल्या खाजगी रुग्णालयात डाव्या हाताच्या उपचारासाठी सकाळी ११ च्या सुमारास गेल्या होत्या.

कल्याणमध्ये वृद्धेचे दागिने लांबवले; खाजगी रुग्णालयातील घटना
कल्याण : एका नामांकित खाजगी रुग्णालयात एक्स-रे काढण्यासाठी गेलेल्या एका ७६ वर्षीय वृद्ध महिलेच्या हातातील एक लाख ८० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या एका भामट्याने लांबवल्याची घटना मंगळवारी घडली. धक्कादायक बाब म्हणजे, या चोरट्याने आपण रुग्णालयाचा कर्मचारी असल्याचे या वृद्धेला भासवले होते, तर एक्स-रे टेक्निशियनला आपण वृद्धेचा नातेवाईक असल्याचे सांगितले होते. बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
पश्चिमेतील आधारवाडी परिसरात राहणाऱ्या कमलादेवी सिंग (७६) या बैलबाजार परिसरात असलेल्या खाजगी रुग्णालयात डाव्या हाताच्या उपचारासाठी सकाळी ११ च्या सुमारास गेल्या होत्या. बाह्यरुग्ण कक्षातील कर्मचाºयाने कमलादेवी यांना हाताचा एक्स-रे काढण्यास सांगितले.
‘तो’ कर्मचारीच नाही
एक्स-रे काढून बाहेर आल्यानंतर कमलादेवी यांनी नातेवाइकांना त्या व्यक्तीकडून बांगड्या आणण्यास सांगितले. मात्र, ती व्यक्ती रुग्णालयाची कर्मचारी नसल्याचे सुरक्षारक्षकांनी सांगितल्यानंतर कमलादेवींना आपली फसवणूक झाल्याचे समजले.