शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ईडीचे ‘धाडधाड’ धाडसत्र; दिल्लीतील प्रकरणात पाच राज्यांमध्ये ४० ठिकाणांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 06:50 IST

दिल्ली, तेलंगणा, महाराष्ट्र, तामिळनाडू, हरयाणा, उत्तर प्रदेश व कर्नाटकातील ३८ ते ४० ठिकाणी छापे टाकून झडती घेण्यात येत आहे.

नवी दिल्ली : दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील अनियमिततांशी संबंधित मनी लॉण्ड्रिंगच्या तपासासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीसह अन्य राज्यांतील ४० ठिकाणी मंगळवारी छापे टाकले. 

दिल्ली, तेलंगणा, महाराष्ट्र, तामिळनाडू, हरयाणा, उत्तर प्रदेश व कर्नाटकातील ३८ ते ४० ठिकाणी छापे टाकून झडती घेण्यात येत आहे. ही ठिकाणे यात आरोपी असलेले काही सरकारी अधिकारी व खासगी व्यक्तीची आहेत, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तथापि, ही ठिकाणे मनीष सिसोदिया यांच्याशी संबंधित नाहीत, असेही ते म्हणाले. 

सीबीआयच्या अहवालाची दखल घेत ईडीने प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉण्ड्रिंग ॲक्टच्या गुन्हेगारी कलमांनुसार तपास सुरू केला. सीबीआयने सिसोदिया व अन्य १४ जणांना आरोपी बनविले आहे. सीबीआयने दि. १९ ऑगस्ट रोजी सिसोदिया व दिल्लीचे माजी उत्पादन शुल्क आयुक्त अरव गोपी कृष्णा यांच्या दिल्लीतील निवासस्थानांसह सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील १९ ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या सिसोदिया यांच्याकडे उत्पादन शुल्क व शिक्षण यांसह अनेक खाती आहेत.

दिल्लीच्या उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित कथित घोटाळ्यात दिल्लीचे उपमुख्यमंंत्री मनीष सिसोदिया आणि काही नोकरशहांना आरोपी बनविण्यात आले आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये उत्पादन शुल्क धोरण बदलण्यात आले होते. हे बदल आता मागे घेण्यात आले आहेत.

अनियमिततांच्या चौकशींची मागणी-  दिल्लीच्या नव्या उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीतील कथित अनियमिततांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी जुलैमध्ये केल्यानंतर हे धोरण रडारवर आले होते. त्यांनी याप्रकरणी ११ उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. -  सिसोदिया यांनीही या धोरणातील कथित अनियमिततांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली होती. दिल्लीचे मुख्य सचिव नरेश कुमार यांनी यात प्रथमदर्शनी विविध कायद्यांचे उल्लंघन झाल्याचे आपल्या अहवालात नमूद केले होते. त्याआधारे सीबीआय चौकशीची शिफारस करण्यात आली होती. 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयraidधाडCrime Newsगुन्हेगारी