शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
2
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
3
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण
5
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
7
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हूडाने मनातली भावना स्पष्टच सांगितली
8
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
9
गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'
10
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
11
जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका
12
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
13
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
14
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
15
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
16
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
17
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
19
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
20
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही

ईडीची मोठी कारवाई! सुशिलकुमार शिंदेंची मुलगी, जावयाची करोडोंची मालमत्ता केली जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 9:26 AM

ED attaches priti shinde's property: पीएमएलए कायद्यानुसार जप्त केलेल्या या मालमत्ता या अंधेरीतील असून 10,550 चौरस फूटांच्या दोन व्यावसायिक मालमत्ता आहेत. प्रीती श्रॉफ या काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे यांची कन्या आणि प्रणिती शिंदे यांची बहीण आहेत. 

मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्या नातेवाईकांवर ईडीने मोठी कारवाई केली असून त्यांची मुलगी (priti shinde) आणि जावयाची सुमारे 35.48 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. दीवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे प्रमोटर्स कपिल आणि धीरज वाधवान यांच्याशी संबंधित एका मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. (ED attaches assets of Sushil Kumar Shinde's daughter, son-in-law in money laundering case.)

सुशिलकुमार शिंदेची मुलगी प्रीती आणि जावई राज श्रॉफ यांची ही मालमत्ता आहे. ही मालमत्ता अंधेरीतील कालेडोनिया इमारतीमधील आहे. 

पीएमएलए कायद्यानुसार जप्त केलेल्या या मालमत्ता या अंधेरीतील असून 10,550 चौरस फूटांच्या दोन व्यावसायिक मालमत्ता आहेत. प्रीती श्रॉफ या काँग्रेस नेते सुशिलकुमार शिंदे यांची कन्या आणि प्रणिती शिंदे यांची बहीण आहेत. 

डीएचएफएल (DHFL) अनेक घोटाळ्यांमध्ये सामील पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) दीवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेडला दिलेलं 3,688.58 कोटी कर्ज हे घोटाळा घोषित केले आहे. यस बँकेतील घोटाळ्याबाबतही या कंपनीची चौकशी सुरु आहे. कंपनीचे प्रमोटर वाधवान बंधू अटकेत आहेत आणि त्यांची मालमत्ता देखील ईडीने जप्त केली आहे. यस बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी ईडीने माजी बँक प्रमुख राणा कपूर आणि डीएचएफएलचे प्रमोटर कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्याकडे 2400 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. यात राणा कपूरचे 1000 कोटी आणि वाधवान बंधूंच्या 1400 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा समावेश आहे.भारतीय रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबरमध्ये दिवाळखोरी प्रक्रियेसाठी डीएचएफएलला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (एनसीएलटी) सोपवले आहे. डीएचएफएल ही पहिली वित्तीय कंपनी आहे, ज्या कंपनीला आरबीआयने एनसीएलटीला कलम 227 अंतर्गत विशेष अधिकारांचा वापर करून सोपविले. तत्पूर्वी कंपनीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे आणि प्रशासक म्हणून आर सुब्रमण्यम कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेPraniti Shindeप्रणिती शिंदेEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयPMC Bankपीएमसी बँक