ईडीची कारवाई : इक्बाल मिर्चीची आणखी सहाशे कोटींची मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 08:29 PM2019-12-11T20:29:02+5:302019-12-11T20:30:40+5:30

मुंबई,लोणावळ्यातील फ्लॅट,बंगले व कार्यालय सील

ED's Action : Seized another Rs 600 crore worth of property of Iqbal Mirchi | ईडीची कारवाई : इक्बाल मिर्चीची आणखी सहाशे कोटींची मालमत्ता जप्त

ईडीची कारवाई : इक्बाल मिर्चीची आणखी सहाशे कोटींची मालमत्ता जप्त

Next
ठळक मुद्देसुमारे १२०० पानी आरोपपत्रामध्ये त्याची पत्नी व दोन मुलांसह १२ जणाविरुद्ध आरोप ठेवण्यात आलेले आहे.या सर्व मालमत्तेची किंमत अंदाजे ६०० कोटी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मुंबई - सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमचा निकटचा साथीदार व मृत गॅगस्टर इक्बाल मिर्ची उर्फ मेनन याच्या मालकीच्या मुंबईलोणावळा येथील सुमारे फ्लॅट, कार्यालय आणि बंगले जप्त केले. या मालमत्तेची किंमत सहाशे कोटी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. अवैध पद्धतीने संपत्ती जमविल्याप्रकरणी(मनी लॉण्डरिंग) ईडीने सोमवारी आरोपपत्र दाखल केले आहे. सुमारे १२०० पानी आरोपपत्रामध्ये त्याची पत्नी व दोन मुलांसह १२ जणांविरुद्ध आरोप ठेवण्यात आलेले आहे.

१९९३ च्या बॉम्बस्फोटातील फरार आरोपी इक्बाल मिर्चीचे २०१३ मध्ये लंडनमध्ये निधन झाले आहे. त्याच्या मालकीची मुंबईसह देशभरात मिळकती असून त्या हवालामार्फत त्यातून शेकडो कोटीचे गैरव्यवहार करण्यात आल्याचे ईडीच्या तपासातून स्पष्ट झाले आहे. मिर्चीच्या वरळी येथील सीजे हाऊस तिसऱ्या व चौथ्या मजल्यावरील फ्लॅट, ताडदेव येथील अरुण चेबर्स येथील कार्यालय, वरळीतील साहिल बंगल्यातील तीन फ्लॅट, क्रॉफर्ड मार्केट येथील तीन दुकान गाळे आणि लोणावळा येथील बंगला व भूखंड जप्त केला आहे. या सर्व मालमत्तेची किंमत अंदाजे ६०० कोटी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीला ईडीने रणजित बिंद्रा व हारुण युसूफ या दलालांना अटक केली. त्यानंतर मिर्चीच्या मालमत्तेतील गैरव्यवहाराचा छडा लागला आहे. इक्बाल मिर्चीचे फरारी असताना २०१३ मध्ये लंडनमध्ये निधन झाले आहे. त्याने १९८६ मध्ये मोहम्मद युसुफ ट्रस्टच्या वरळी येथील तीन मालमत्ता साडे सहा लाखांना विकत घेतली होती. त्याच्या मृत्यूनंतर ही मालमत्ता सुमारे २०० कोटींना विकण्यात आली आहे. या व्यवहारामध्ये सन्बिक रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्यावतीने रणजित सिंग बिंद्रा व हारुण युसूफ याने दलाली केली होती.

Web Title: ED's Action : Seized another Rs 600 crore worth of property of Iqbal Mirchi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.