उत्तेजक व्हिडिओ अन् अश्लील भाषा वापरून कमवायचे दरमहिना ३५ हजार; पोलीस तपासात केले कबूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 09:52 IST2025-07-16T09:51:54+5:302025-07-16T09:52:34+5:30
संभल जिल्ह्यातील शहवाजपूर येथे राहणाऱ्या तिन्ही मुली अनेक दिवसांपासून सोशल मीडियात अश्लील व्हिडिओ अपलोड करत होत्या.

उत्तेजक व्हिडिओ अन् अश्लील भाषा वापरून कमवायचे दरमहिना ३५ हजार; पोलीस तपासात केले कबूल
संभल - सध्याच्या काळात सोशल मीडियाची युवकांना फार क्रेझ आहे. त्यात काही सेकंदाच्या रिल्समधून मिळणारी प्रसिद्धी आणि कुठल्याही मार्गाने पैसे कमावण्याची लालच एखाद्याला जेलमध्ये टाकू शकते त्याचे ताजे उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशातील संभल येथे पाहायला मिळाले. याठिकाणी सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ टाकण्यावरून महक, निशा उर्फ परी आणि हिना यांना कॅमेरामन आलमसह पोलिसांनी अटक केली आहे.
या मुली त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रोज अश्लील कृत्य, शिवीगाळ करणारे व्हिडिओ अपलोड करत होते. त्यांच्या या व्हिडिओला हजारोने व्ह्यूज मिळत होते. एक एक व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत पोहचत होता. हे व्ह्यूज या दोघींच्या कमाईचे साधन बनले. या तिन्ही मुली सोशल मीडियात अश्लील व्हिडिओ अपलोड करून महिन्याला ३५ हजार कमाई करत होत्या असं पोलीस तपासात समोर आले आहे.
संभल जिल्ह्यातील शहवाजपूर येथे राहणाऱ्या तिन्ही मुली अनेक दिवसांपासून सोशल मीडियात अश्लील व्हिडिओ अपलोड करत होत्या. या व्हिडिओत वापरणारी भाषा, इशारे आणि इतके आक्षेपार्ह दृश्य होते ज्यामुळे गावातील काही जबाबदारी व्यक्तींनी तिघींविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक केके. बिश्नोई यांनी संबंधित पोलीस स्टेशनला तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी या तिन्ही मुलींच्या इन्स्टाग्रामची पाहणी केली. त्यात नियमितपणे या तिघी शिवीगाळ आणि उत्तेजक इशारे असणारे रिल्स अपलोड करत असल्याचे पुढे आले. रविवारी पोलिसांनी रात्री महक, परी आणि हिनासोबत त्यांच्या कॅमेरामॅनवर गुन्हा दाखल केला. या सर्व आरोपींना अटक करून त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले.
तपासात काय समजलं?
इन्स्टाग्रामवर कमी वेळात व्हायरल होण्याचे खुळ तिघींना होते, त्यातूनच अश्लील व्हिडिओ बनवण्याची सुरुवात झाली. एक-दोन व्हिडिओ व्हायरल झाले, त्यातून व्ह्यूज आणि फॉलोअर्सही वाढले. इन्स्टाग्रामवर कमाई होऊ लागली. सुरुवातीला केवळ प्रसिद्धीसाठी व्हिडिओ बनवले जात होते. एखादा चांगला व्हिडिओ टाकला तर त्याला व्ह्यूज मिळत नव्हते त्यामुळे अश्लील भाषेचा वापर केला. त्यातून फॉलोअर्स वाढले आणि ब्रँडकडून प्रमोशनसाठी पैसेही येऊ लागले असं महकने पोलीस चौकशीत सांगितले. इन्स्टाग्राम आणि अन्य मार्गातून जवळपास ३०-३५ हजार महिन्याला मिळायचे. या कमाईची चार वाटणी व्हायची असं पोलीस तपासात कळले.