शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

कानातले, सुटकेस आणि कार उलगडणार मुलीच्या मृत्यूचे रहस्य, मृतदेह सापडला जळालेल्या अवस्थेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 15:43 IST

Murder Mystry Case : या पुराव्यांच्या आधारे सध्या पोलिसांची चार पथके सातत्याने कार्यरत आहेत.

दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये मृतदेह जाळल्याच्या प्रकरणी गुन्ह्याची उकल पोलिसांना करता आलेली नाही. या जळालेल्या मृतदेहाकडील कानातले, सुटकेस, कार आणि थिनर हे पोलिसांकडे असे पुरावे आहेत की ज्यामुळे हत्या प्रकरणाचे गूढ उकलता येईल. या पुराव्यांच्या आधारे सध्या पोलिसांची चार पथके सातत्याने कार्यरत आहेत.पोलीस आता कानातल्याच्या माध्यमातून महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. महिलेचा मृतदेह ह्युंदाई वेर्ना कारमधून आणून पेटवून दिल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. त्या गाडीचाही पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांना घटनास्थळाहून एक सूटकेस आणि थिनरच्या खुणाही सापडल्या आहेत, कारण थिनर टाकून मृतदेह जाळण्यात आला होता.पोलीस आता या तिन्ही गोष्टींच्या माध्यमातून मारेकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये महिलेच्या मानेवर गळ्यावर जखमेच्या खुणा असल्याचे समोर आले आहे. म्हणजेच आधी महिलेची हत्या करून तिचा मृतदेह गाझियाबादला आणून जाळण्यात आला. महिलेच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमाही आढळून आल्या आहेत, त्यामुळे महिलेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे समजते. त्याचबरोबर बलात्काराचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी नमुने प्रयोगशाळेत तपासासाठी पाठवले आहेत.

कुत्रा भुंकल्याने भडकला, शेपूट पकडून श्वानाला फेकला तर मालकाला लोखंडी रॉडनं धोपटलंसाहजिकच ओळख पटल्यानंतर पोलीस  मारेकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतात. या जळालेल्या महिलेचा मृतदेहाची ओळख पटवणं हे पोलिसांसमोर मोठे आव्हान राहिले आहे. अखेर, खून करून जाळल्यानंतर गाझियाबादमध्ये आणलेली ही महिला कोण? गाझियाबाद पोलीस आसपासच्या जिल्ह्यांशीही संपर्क साधत आहेत जेणेकरून महिलेची ओळख पटवून मारेकऱ्यांपर्यंत पोहोचता येईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेश