शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

मरिना बीचवरील आंदोलनादरम्यान भाजपा नेते एच. राजा, पॉन राधाकृष्णन पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2020 3:09 PM

चेन्नई पोलिसांनी कारवाई करत या सर्वांना ताब्यात घेतले. 

ठळक मुद्देतामिळनाडू पोलिसांनी या प्रकरणी नेल्लई कन्नन यांच्याविरुद्ध कलम ५०४, ५०५ आणि ५०५ (२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे आणि अटक देखील केलीभाजपाचे ज्येष्ठ नेते एच. राजा, पॉन राधाकृष्णन, सीपी राधाकृष्णन, एल. गणेशन यांच्यासह ३०० जणांवर चेन्नई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

चेन्नई - मरीना बीचवर आंदोलन करण्यासाठी जमलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एच. राजा, पॉन राधाकृष्णन, सीपी राधाकृष्णन, एल. गणेशन यांच्यासह ३०० जणांवर चेन्नई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी मरीना बीचवर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सर्व नेत्यांसह ३०० जण तामीळ लेखक आणि काँग्रेसचे नेते नेल्लई कन्नन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शहा यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध करत आंदोलनासाठी जमले होते. त्यावेळी चेन्नई पोलिसांनी कारवाई करत या सर्वांना ताब्यात घेतले.नुकतेच तामिळनाडू येथे झालेल्या बैठकीत बोलताना नेल्लई कन्नन यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA) वादग्रस्त भाषण केले होते. अल्पसंख्यकांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची हत्या केली पाहिजे, असे आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक वक्तव्य तामीळ लेखक आणि काँग्रेसचे नेते नेल्लई कन्नन यांनी केले होते. भाजपाने त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला असून पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात निषेध करण्यासाठी आयोजित सभेत २९ डिसेंबर रोजी नेल्लई कन्नन म्हणाले की, मला वाटत होते की कोणीतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना संपवेल पण असे झाले नाही. अमित शहा हे पंतप्रधान मोदी यांना नियंत्रित करत आहेत, असा आरोप कन्नन यांनी केला होता. कन्नन यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यासाठी तामिळनाडूच्या पोलिसांनी कन्नन याना अटक करावी अशी मागणी भाजपाचे राष्ट्रीय सचिव एच. राजा यांनी केली. त्यांनी याबाबत तामिळनाडू सरकार आणि पोलीस महानिदेशक यांच्याकडे तक्रार करून त्वरित करवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर तामिळनाडू पोलिसांनी या प्रकरणी नेल्लई कन्नन यांच्याविरुद्ध कलम ५०४, ५०५ आणि ५०५ (२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे आणि अटक देखील केली.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपाTamilnaduतामिळनाडूPoliceपोलिसChennaiचेन्नई