During Lockdown police raids in mosques, secret prayers of hundreds of people in mosques pda | लॉकडाऊनमुळे पोलिसांनी छापाच टाकला, मशीदींमध्ये शेकडो लोकांचे लपून नमाज पठण

लॉकडाऊनमुळे पोलिसांनी छापाच टाकला, मशीदींमध्ये शेकडो लोकांचे लपून नमाज पठण

ठळक मुद्देवास्तविक डीबई पोलिस ठाणे परिसरातील ही घटना आहे.मौलानांविरोधात एफआयआर नोंदवून दोघांना अटक करण्यात आली.लॉकडाऊनदरम्यान लोकांना घरातच राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

बुलंदशहर - कोरोनाशी सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर देशभरात लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. परंतु उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील डीबाई पोलीस ठाण्याच्या परिसरातील दोन मशिदीतील लोक मोठ्या संख्येने गुप्तपणे नमाज अदा करण्यासाठी पोहोचले. नमाज अदा केल्यानंतर कुणीतरी पोलिसांना माहिती दिली आणि पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि दोन्ही मशिदींच्या मौलानास अटक केली आणि त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. मात्र, काही वेळाने दोन मौलाना यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. यासह त्यांना कडक शब्दात कानउघडणी करण्यात आली आहे.

वास्तविक डीबई पोलिस ठाणे परिसरातील ही घटना आहे. लॉकडाऊन असूनही, मोठ्या संख्येने लोक बुधवारी दोन मशिदींमध्ये नमाज अदा करण्यासाठी दाखल झाले. दरम्यान, पोलिसांनी माहिती मिळाल्यावर छापा टाकण्यात आला. या छापाची माहिती मिळताच नमाज पाठवण्यासाठी आलेले लोक बाहेर पडले. पोलिसांनी कारवाई करत दोन्ही मशिदींचे मौलाना ताब्यात घेतले. यानंतर त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. मौलानांविरोधात एफआयआर नोंदवून दोघांना अटक करण्यात आली.

तर न्यायालयाने दोन्ही मौलानांना जामिनावर सोडले. एसएसपी बुलंदशहर संतोषकुमार सिंग यांनी कडक इशारा दिला की जर कोणी धार्मिक ठिकाणी नमाज किंवा पूजा केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. लॉकडाऊनदरम्यान लोकांना घरातच राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

 

Web Title: During Lockdown police raids in mosques, secret prayers of hundreds of people in mosques pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.