शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

गृहराज्यमंत्र्यांच्या नावाने व्यावसायिकाला गंडा, शस्त्र परवान्यासाठी साडेनऊ लाखाला लावला चुना 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 2:00 PM

पेठेवर आठ वेगवेगळे गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

ठळक मुद्देअतुल पेठे असं या भामट्याचे नाव असून तो ठाण्यात राहतो.याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी चुना लावणाऱ्या इसमास अटक केली आहे. १ वर्ष उलटून गेले तरी परवाना न मिळाल्याने पवार यांनी चौकशी केली असता त्यांचा अर्ज फेटाळण्यात आल्याचे त्यांना समजले.

 

मुंबई - शस्त्र परवाना काढण्यासाठी राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांच्या नावाने व्यावसायिकाला साडेनऊ लाखांना चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये घडला आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी चुना लावणाऱ्या इसमास अटक केली आहे. अतुल पेठे असं या भामट्याचे नाव असून तो ठाण्यात राहतो. यापूर्वीही पेठेवर आठ वेगवेगळे गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अंबरनाथमध्ये राहणार व्यावसायिक उमेश पवार यांनी शस्त्र परवाना काढण्यासाठी अर्ज केला होता. यावेळी तुमचे काम गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्याद्वारे करून देतो अशी बतावणी करून अतुल पेठे या भामट्याने पवार यांच्याकडून तब्बल साडेनऊ लाख रुपये उकळले आहेत.मात्र, १ वर्ष उलटून गेले तरी परवाना न मिळाल्याने पवार यांनी चौकशी केली असता त्यांचा अर्ज फेटाळण्यात आल्याचे त्यांना समजले.अर्ज फेटाळल्याची माहिती मिळताच पवार यांनी भामट्या पेठेकडे त्याबाबत चौकशी केली. त्यावर पवार यांना पेठेने अरेरावीची उत्तरे दिली. त्यामुळे पवार यांनी पोलिसांत धाव घेत याबाबतची तक्रार दाखल केली. नंतर पोलिसांनी चौकशी करून पेठे याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी पेठे याच्याकडे अधिक चौकशी केली. तसेच याबाबत तपास केल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार पेठे हा काही वर्षांपूर्वी एयर इंडियामध्ये केबिन क्रू म्हणून काम करत होता. गृहराज्यमंत्री रणजित पाटील किंवा इतर कोणत्याही मंत्र्यांशी पेठे याचा संबंध नसल्याचे पोलिसांनी माहिती दिली आहे. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसState Governmentराज्य सरकारHomeघरfraudधोकेबाजी