सिगारेट आणून न दिल्याने भाजी विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 19:41 IST2018-10-04T19:30:29+5:302018-10-04T19:41:08+5:30
कमलेश रामेश्वर जाधव (वय ३३), अहमद हुसेन नबी हुसेन खान उर्फ गुड्डू (वय ३५) अशी या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील दोन आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

सिगारेट आणून न दिल्याने भाजी विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला
मुंबई - चेंबूर परिसरात सिगारेट आणून देण्यास नकार दिल्याच्या रागातून चार सराईत आरोपींनी एका भाजी विक्रेत्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. कमलेश रामेश्वर जाधव (वय ३३), अहमद हुसेन नबी हुसेन खान उर्फ गुड्डू (वय ३५) अशी या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील दोन आरोपी सध्या फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.