मद्यधुंद तरुणींनी घातला धिंगाणा, पान विक्रेत्याला केली शिवीगाळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 17:04 IST2018-09-24T15:52:24+5:302018-09-24T17:04:35+5:30

इतकं सर्व होऊन देखील सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली नव्हती त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील कायदा व्यवस्थेची या व्हिडीओने पोलखोल केली आहे. 

The drunkards has razzled, had make shabby to hawker | मद्यधुंद तरुणींनी घातला धिंगाणा, पान विक्रेत्याला केली शिवीगाळ 

मद्यधुंद तरुणींनी घातला धिंगाणा, पान विक्रेत्याला केली शिवीगाळ 

कल्याण  - कल्याण रेल्वे स्थानक परिसरात मद्यधुंद तरुणींनी धिंगाणा घालत सिगारेट, पान विक्रेत्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केलं. इतक्यावरच न थांबता त्या तरुणींनी विक्रेत्याच्या सामानाची फेकाफेक केली. तसेच रिक्षावाल्याशी हुज्जत घातली. हा सर्व प्रकार रात्रीच्या सुमारास घडलेला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इतकं सर्व होऊन देखील सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली नव्हती त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील कायदा व्यवस्थेची या व्हिडीओने पोलखोल केली आहे. 

Web Title: The drunkards has razzled, had make shabby to hawker