मद्यपी महिलेची पती, मुलांना बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 10:31 IST2023-02-28T10:31:02+5:302023-02-28T10:31:21+5:30

दोन्ही मुलींना त्यांच्या आई सुदेसना हिने स्टीलच्या लाटणे आणि झाऱ्याने जबर मारहाण केल्याचा मोबाइलमधील व्हिडीओ छोट्या नायेराने वडिलांना दाखवला.

Drunk woman beats husband and children | मद्यपी महिलेची पती, मुलांना बेदम मारहाण

मद्यपी महिलेची पती, मुलांना बेदम मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : दारू पिऊन स्वतःच्या अल्पवयीन मुलींना नेहमी मारहाण करणाऱ्या आईविरुद्ध भाईंदरच्या नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

   याबाबत २५ फेब्रुवारीला दाखल गुन्ह्यातील फिर्यादीनुसार, निमई बाऊर (३९) हे भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक फेज ८ मधील सिद्धिविनायक टॉवरमध्ये पत्नी सुदेसना (३३), मुली निराली (१२) आणि नायेरा (६) यांच्यासह राहतात. निमई  हे मुंबईच्या झवेरी बाजार भागात दागिने डिझाईन करायचे काम करतात. निराली ही सहावीत, तर नायेरा सीनियर केजीमध्ये शिकते. गेल्या ८ वर्षांपासून सुदेसना हिला दारूचे व्यसन जडले असून ती दारू पिऊन नेहमी पती निमई यांच्यासह मुलींना मारझोड, शिवीगाळ करते.

निमईला त्याचा मित्र अमोल माहेती याने कॉल करून तुझ्या दोन्ही मुलींच्या हातापायाला लागल्याचे सांगितले. त्यानंतर निमई हे कामावरून लगेच निघून मित्राकडे पोहोचले. दोन्ही मुलींना त्यांच्या आई सुदेसना हिने स्टीलच्या लाटणे आणि झाऱ्याने जबर मारहाण केल्याचा मोबाइलमधील व्हिडीओ छोट्या नायेराने वडिलांना दाखवला. दोन्ही मुलींवर औषधोपचार करून निमई हे घरी पोहोचले. त्यांनी सुदेसना हिला जाब विचारला असता तिने पतीला शिवीगाळ केली. निमई यांच्या फिर्यादीवरून सुदेसनावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Drunk woman beats husband and children