Video : फ्लाईंग राणी एक्सप्रेसमध्ये दारुड्याने घातला धिंगाणा; प्रवाशांनी उतरवली नशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 21:59 IST2019-08-08T21:41:18+5:302019-08-08T21:59:20+5:30
पालघर रेल्वे स्थानकावर उतरवून रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले.

Video : फ्लाईंग राणी एक्सप्रेसमध्ये दारुड्याने घातला धिंगाणा; प्रवाशांनी उतरवली नशा
पालघर - मुंबई सेंट्रल येथून सुरतकडे जाणाऱ्या एक्सप्रेसमध्ये जनरल कोचमध्ये दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या दारुड्याला प्रवाशांनी चांगलाच इंगा दाखवला आहे. फ्लाईंग राणी एक्सप्रेसमध्ये हा प्रकार घडला असून याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या दारुड्याचं नाव सर्वेंन गोर असल्याचे सूत्रांनी सांगितले. फ्लाईंग राणी एक्सप्रेसमधील जनरल कोचमध्ये बसण्याच्या सीटवर हा दारुडा बूट घालून बसला होता. त्याला पाय खाली घेण्यास सांगितले असता त्याने शिवीगाळ करून धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. हे पाहून संतप्त प्रवाश्यांनी त्यांनी या दारुड्याला चोपले आणि पालघररेल्वे स्थानकावर उतरवून रेल्वेपोलिसांच्या स्वाधीन केले. पुढील तपास पोलीस करत आहेत.