उत्तनमध्ये दुचाकीला उडवून मद्यधुंद कुटुंबाचा पोलिसांवर हल्ला; २ महिला व २ पुरुषांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 00:02 IST2026-02-04T00:01:59+5:302026-02-04T00:02:20+5:30

भाईंदरच्या उत्तन भागात एका दुचाकीला उडवून नंतर पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की, मारहाण करणाऱ्या कुटुंबातील २ महिला व २ पुरुषांवर उत्तन सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Drunk family attacks police by blowing up bike in Uttan; Case registered against 2 women and 2 men | उत्तनमध्ये दुचाकीला उडवून मद्यधुंद कुटुंबाचा पोलिसांवर हल्ला; २ महिला व २ पुरुषांवर गुन्हा दाखल

उत्तनमध्ये दुचाकीला उडवून मद्यधुंद कुटुंबाचा पोलिसांवर हल्ला; २ महिला व २ पुरुषांवर गुन्हा दाखल

मिरारोड - भाईंदरच्या उत्तन भागात एका दुचाकीला उडवून नंतर पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की, मारहाण करणाऱ्या कुटुंबातील २ महिला व २ पुरुषांवर उत्तन सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ट्रिस्टन एडवर्ड गोन्सालविस (वय २३) हे सोमवारी उत्तन वरुन गोराई दिशेने जात असताना मॅक्सवेल हॉटेल समोर गोराईकडून उत्तनच्या दिशेने येणारी कार चालकाने चुकीच्या मार्गिकेवर विरुद्ध दिशेने भरधाव येऊन ट्रिस्टन ह्याच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात ट्रिस्टन ह्याला जबर मार लागला आणि दुचाकीचे नुकसान झाले. कार चालवणारा रवी गुरु धडके (वय ३८) रा. राम अनंत, इंद्रलोक, भाईंदर पूर्व हा मद्यधुंद होता. अपघाता नंतर रवी याची पत्नी शिल्पा हिने ट्रिस्टन याला चापटी मारली. रवी व शिल्पा सह भावेश (वय ३१)आणि शीतल धडके (वय २९) रा. श्री दर्शन, लोकमान्य नगर, ठाणे यांनी शिवीगाळ केली.

उत्तन पोलीस आले असता शिल्पा हिने महिला पोलीस शिपाई शिंदे यांना चापट मारून शिवीगाळ, दमदाटी केली. आरोपींनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला व पोलिसांना शिवीगाळ, धक्काबुक्की करत महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा सोळंखे यांना पण चापट मारली. मद्यधुंद अवस्थेतील या चौघांनी पोलिसांच्या कर्तव्यात अडथळा निर्माण केला. वेगवेगळे दोन गुन्हे ह्या चौघांवर पोलिसांनी दाखल केले आहेत. हे दोन्ही दाम्पत्य गोराईवरून मद्यपान करून परत येत होते असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Web Title : उत्तन में नशे में धुत परिवार का पुलिस पर हमला; चार लोगों पर मामला दर्ज।

Web Summary : उत्तन में, एक नशे में धुत परिवार ने बाइक सवार को टक्कर मारी, फिर पुलिस पर हमला किया। दो महिलाओं और दो पुरुषों पर मारपीट और ड्यूटी में बाधा डालने के आरोप में मामला दर्ज किया गया है। दंपती गोराई से शराब पीकर लौट रहे थे।

Web Title : Drunk family assaults police after Uttan bike accident; four booked.

Web Summary : In Uttan, a drunk family hit a biker, then assaulted police. Two women and two men are booked for the incident, which involved physical assault and obstruction of duty. The couples were returning from Gorai after drinking.