मुलुंडमध्ये गर्दुल्ल्यांचा धुडगूस; १२ गाड्यांची केली तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2020 20:49 IST2020-01-07T20:46:15+5:302020-01-07T20:49:46+5:30

आतापर्यंत पोलिसांकडून कुठलीही कारवाई न झाल्यामुळे नागरिक दहशतीखाली आहेत.

Drug addicted spoiled peace in Mulund; The vandalism of 12 cars | मुलुंडमध्ये गर्दुल्ल्यांचा धुडगूस; १२ गाड्यांची केली तोडफोड

मुलुंडमध्ये गर्दुल्ल्यांचा धुडगूस; १२ गाड्यांची केली तोडफोड

ठळक मुद्देमुलुंड पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून एका गर्दुल्याला अटक देखील करण्यात आली आहे. हे गर्दुल्ले नशा करून रात्रीच्या वेळी १२ गाड्यांची तोडफोड केली आहे.

मुंबई - मुलुंड येथील खिंडीपाडा परिसरामध्ये गर्दुल्यांनी रात्रीच्या वेळी अक्षरशः धुडगूस घातला होता. हे गर्दुल्ले नशा करून रात्रीच्या वेळी १२ गाड्यांची तोडफोड केली आहे. तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना देखील मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरामध्ये हे गर्दुल्ले रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरून परिसरात पार्क केलेल्या गाड्यांची तोडफोड करतात. परंतु, आतापर्यंत पोलिसांकडून कुठलीही कारवाई न झाल्यामुळे नागरिक दहशतीखाली आहेत.


काल रात्री या गर्दुल्ल्यांची मजल इतकी वाढली की, त्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांवर देखील हल्ला केला. रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांच्या काचा लोखंडी रॉड आणि दगडाने फोडल्या आहेत. यासंदर्भात मुलुंड पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून एका गर्दुल्याला अटक देखील करण्यात आली आहे.

Web Title: Drug addicted spoiled peace in Mulund; The vandalism of 12 cars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.