डॉ. तडवी आत्महत्या प्रकरण : आरोपी डॉक्टरांचा वैद्यकीय पदवी परवाना रद्द करण्याची मनसेची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2019 15:39 IST2019-05-30T15:32:59+5:302019-05-30T15:39:05+5:30
मनसे शिष्टमंडळाने नायर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डाॅ. रमेश भारमल (महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल) यांची भेट घेतली.

डॉ. तडवी आत्महत्या प्रकरण : आरोपी डॉक्टरांचा वैद्यकीय पदवी परवाना रद्द करण्याची मनसेची मागणी
मुंबई - डाॅ. पायल तडवी यांनी केलेल्या तीन महिला सहकारी डॉक्टरांकडून होणाऱ्या रँगिंगला कंटाळून डॉ. पायल तडवी (२६) यांनी २२ मेला गळफास घेऊन नायर हॉस्पिटलच्या वसतिगृहात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्दैवी आत्महत्येचा जाब विचारण्यासाठी मनसे शिष्टमंडळाने नायर हॉस्पिटलचे अधिष्ठाता डाॅ. रमेश भारमल (महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल) यांची भेट घेतली.
या आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्या त्या तिन्ही डाॅक्टरांची पदव्युत्तर प्रवेशातून हकालपट्टी करावी आणि त्यांचा वैद्यकीय पदवी ( एमबीबीएस) परवाना रद्द करावा', अशा अनेक मागण्या मनसे सरचिटणीस रिटा गुप्ता, मनविसे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी मांडल्या आहेत.