शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

संशयास्पद! इंजिनिअरने कुटुंबासह घेतले विष; पती, पत्नी आणि मुलगी तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 17:01 IST

Crime News : वडील आणि मुलीला डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर आईचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. जानकीपुरममध्ये ही घटना घडली. ट्यूबवेल विभागातील एका जेईने पत्नी आणि मुलीसह विष प्राशन केल्याचे सांगितले जात आहे. वडील आणि मुलीला डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर आईचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सर्व पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर आहेत.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ट्यूबवेल विभागात जेई म्हणून काम करणाऱ्या शैलेंद्र कुमार (वय ४५), त्यांची पत्नी गीता (४० वर्षीय) आणि मुलगी प्राची (१७ वर्षीय) यांनी विष प्राशन केले. तिघांनाही तातडीने वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये आणण्यात आले. शैलेंद्र आणि प्राची यांना डॉक्टरांनी तत्काळ मृत घोषित केले, तर गीताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाईड नोटही जप्त करण्यात आली असून, त्यात मृतांनी काही लोकांची नावे लिहिली आहेत. हे लोक कुटुंबाला धमकावत होते, असे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. याप्रकरणी उत्तर विभागाचे डीसीपी कासिम अब्दी यांनी सांगितले की, एक सुसाईड नोट सापडली आहे. ज्यामध्ये काही लोकांची नावे लिहिली आहेत, आम्ही त्यांना लवकरात लवकर अटक करू आणि त्यांची चौकशी करू.

काय आहे संपूर्ण प्रकरण? जानकीपुरम एक्स्टेंशन परिसरात शैलेंद्र कुमार आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व मुलगा असा परिवार आहे. मुलगा सध्या बंगळुरू येथे एका क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेला होता. बुधवारी शैलेंद्र हे पत्नी गीता आणि मुलगी प्राचीसह घरात होते. पोलिसांनी सांगितले की, सकाळी 9.30 वाजता शेजाऱ्यांनी आम्हाला तिघांनी विष प्राशन केल्याची माहिती दिली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांनी विष प्राशन केल्याची माहिती मिळताच आम्ही तात्काळ घर गाठले आणि तिघांनाही ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी पिता-मुलीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले आणि त्यांच्यावर उपचार सुरू केले. आई आईची प्रकृती अत्यंत नाजूक होती आणि डॉक्टरांनी तिला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आला, पण तिचाही मृत्यू झाला. फॉरेन्सिक टीम घरी पोहोचली आहे. जानकीपुरम एक्स्टेंशन पोलिसांचे म्हणणे आहे की, आम्हाला एक सुसाइड नोट सापडली आहे, घराची झडती घेतली जात आहे आणि फॉरेन्सिक तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. यासोबतच या तिघांना ज्या शेजाऱ्यांनी आधी पाहिले होते, त्यांची पोलीस चौकशी करत आहेत. सुसाईड नोटमध्ये नाव असलेल्या व्यक्तींचा शोध सुरू आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेश