शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मनरेगाच्या कामातून दुहेरी हत्येने खळबळ; 'समाजवादी पक्षाच्या नेत्याचा आणि मुलाचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 15:42 IST

भरदिवसा सगळ्यांसमोर झालेल्या या दुहेरी हत्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देहल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाला. धक्कादायक म्हणजे याचा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. सपा नेते छोटा लाल दिवाकर आणि त्याचा मुलगा सकाळी शेतात फिरण्यासाठी गेले असता तिथे त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

संभल( उत्तर प्रदेश) -  लॉकडाऊनमध्ये डबल मर्डरचा एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. उत्तर प्रदेशमधील संभल जिल्ह्यात समाजवादी पक्षाचे नेते आणि त्यांच्या मुलाची गोळ्या घालून ठार मारण्यात आले. गावात रस्ता बांधल्याच्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे. या हत्येच्या घटनेचा थेट व्हिडिओही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हल्ला केल्यानंतर आरोपी फरार झाला. धक्कादायक म्हणजे याचा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. भरदिवसा सगळ्यांसमोर झालेल्या या दुहेरी हत्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.सपा नेते छोटा लाल दिवाकर आणि त्याचा मुलगा सकाळी शेतात फिरण्यासाठी गेले असता तिथे त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. मृत सपा नेते चंदौसी या विधानसभा मतदार संघातील समाजवादी पक्षाचे माजी उमेदवार होते. गावातीलच ग्रामस्थांवर त्यांच्या दुहेरी हत्येचा आरोप करण्यात आला आहे. हे दुहेरी हत्या प्रकरण संभल जिल्ह्यातील बहजोई पोलीस स्टेशन परिसरातील आहे. येथील समसोई गावात रस्त्यावरुन दोन्ही पक्षात वाद झाला. सपा नेत्यांची पत्नी ग्राम प्रमुख आहे. गावात रस्ता बनवण्याचे काम सुरू आहे, याला काही लोकांचा विरोध होता. हा वाद इतका वाढला की, हत्येपर्यंत टोकाला गेला आहे. दरम्यान, सपा नेते छोटा लाल दिवाकर आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या त्यांच्या मुलाला गोळ्या घालण्यात आल्या.

आरोपी गोळीबार करीत असताना बरीच लोक तिथे हजर होती. लोकांनी या घटनेचा व्हिडिओ मोबाईलवर शूट केला. या व्हिडिओमध्ये आरोपी गोळ्या झाडताना स्पष्ट दिसत आहेत. सध्या पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतले आहे, परंतु खुनाचा मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या घटनेनंतर परिसरातील राजकारण तापले आहे. जिल्ह्यातील उच्च अधिकारीही घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. सपा नेत्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांना कळविण्यात आले.पण उशिरा घटनास्थळी पोहोचल्याचा आरोप परिवाराने केला आहे. सध्या गावातील तणावाचे वातावरण पाहता पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तसेच आरोपींचा तपास करण्याचं काम सध्या पोलीस करत आहेत.

 

 

Coronavirus : 'हॉटस्पॉट' मुंबईत केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात, उद्धव ठाकरेंनी केली होती मागणी

 

सीमेवर असलेले एटीएम डिटोनेटरने उडवले, रक्कम घेऊन आरोपी फरार

 

'माझा चेहरा शेवटचा पाहून घे', असं आईला प्रेमवेड्या युवकाने म्हणत झाडली स्वतःवर गोळी  

 

Coronavirus : लढवय्या २९१ पोलिसांनी केली कोरोनावर मात, आणखी लवकरच सुखरूप होऊन घरी परतणार

टॅग्स :FiringगोळीबारMurderखूनDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसSamajwadi Partyसमाजवादी पार्टी